Join us  

२ ब्रेडच्या स्लाइस-१ कपभर दूध, करा पोटभरीचं गारेगार डेझर्ट! गोड खाण्याची चंगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2023 2:06 PM

Trending Milk Bread Recipes, Soft and Fluffy Sweet Milk Bread जेवण झाल्यावर कधीकधी गोड खावंसं वाटतं, ऐनवेळी काय करणार? त्यावरच हा इंस्टंट डेझर्टचा गोड पर्याय

ब्रेड हा एक असा पदार्थ आहे, जो नाश्त्यापासून ते डिनरपर्यंत खाल्ला जाऊ शकतो. छोटी भूक भागवण्यासाठी ब्रेड हा बेस्ट ऑप्शन आहे. गोड असो किंवा तिखट ब्रेड प्रत्येक पदार्थात फिट होतो. ब्रेडचे अनेक पदार्थ केले जातात. सँडविच, ब्रेड रोल, ब्रेड पकोडा, रस्क किंवा गार्लिक ब्रेड हे पदार्थ लोकं चवीने खातात. पण आपण कधी मिल्क ब्रेड हा पदार्थ खाल्ला आहे का?

कधी - कधी आपल्याला गोड पदार्थ खाण्याची प्रचंड इच्छा होते. अशावेळी काय खावं हे सुचत नाही. घरात काही गोड पदार्थ उपलब्ध नसेल तर, मिल्क ब्रेड हि रेसिपी ट्राय करून पाहा. मिल्क ब्रेड ही रेसिपी कमी साहित्यात कमी वेळात तयार होते. गोड खाण्याची क्रेविंग्स भागवण्यासाठी मिल्क ब्रेड हा परफेक्ट ऑप्शन आहे. डिनरनंतर डेझर्ट म्हणूनही हा पदार्थ खाल्ला जाऊ शकतो. हा पदार्थ घरातील प्रत्येक व्यक्तीला नक्की आवडेल. चला तर मग या झटपट गोड पदार्थाची कृती पाहुयात(Trending Milk Bread Recipes, Soft and Fluffy Sweet Milk Bread).

मिल्क ब्रेड करण्यासाठी लागणारं साहित्य

२ ब्रेड

२ कप दूध

१ टीस्पून बटर

चवीनुसार साखर

पालकाची भाजी आवडत नसली तरी पालकाची कुरकुरीत वडी नक्की आवडेल, पालक वडीची सोपी रेसिपी

१ टीस्पून कस्टर्ड पावडर

१ टीस्पून टुटी-फ्रुटी

३-४ पुदिन्याची पाने

कृती

मिल्क ब्रेड करण्यासाठी सर्वप्रथम, पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा बटर घाला, बटर मेल्ट झाल्यानंतर त्यावर २ ब्रेड ठेऊन दोन्ही बाजूने भाजून घ्या. आता हे ब्रेड एकमेकांवर ठेवा. मग त्यावर एक कप दूध घाला, व ब्रेड दुधात चांगले भिजवा. ५ ते ६ मिनिटांसाठी लो फ्लेमवर ब्रेड शिजवून घ्या.

भजी फार तेलकट होतात? ४ उपाय - भजी तेल पिणार नाहीत - होतील खमंग

५ मिनिटे झाल्यानंतर ब्रेडवर चवीनुसार साखर घाला. आता एका वाटीत दूध घ्या, त्यात दीड चमचा कस्टर्ड पावडर घालून मिक्स करा. कस्टर्ड पावडरचं हे मिश्रण ब्रेडवर घाला, व २ मिनिटांसाठी शिजू द्या. अशा प्रकारे चविष्ट मिल्क ब्रेड खाण्यासाठी रेडी. सजावटीसाठी आपण त्याच्यावर टूटी-फ्रूटी व पुदिन्याची पाने घालून सर्व्ह करू शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स