नाश्ता (Breakfast) म्हटलं की इडली, डोसा, अप्पे, उत्तप्पा आणि मेदू वडे (Medu Vada) हे चमचमीत पदार्थ डोळ्यांसमोर येतात. शिवाय हे पदार्थ खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. नाश्त्याला साऊथ इंडियन पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. पण साउथ इंडियन पदार्थ तयार करताना अनेक चुका होतात. त्यात दाक्षिणात्य चव कुठेतरी कमी पडते. मुख्य म्हणजे मेदू वडा हवा तसा मनासारखा तयार होत नाही.
बरेच जण अण्णाच्या स्टॉलवर जाऊन मेदू वड्याचा आस्वाद घेतात (Cooking Tips and Tricks). पण घरात तयार करताना मेदू वडा कधी बिघडतो. तर कधी डोनटसारखा आकार हवा तसा येत नाही. जर आपल्या परफेक्ट दाक्षिणात्य पद्धतीचा मेदू वडा तयार करायचा असेल तर, एकदा ही रेसिपी करून फॉलो करून पाहा. उडप्यासारखा मेदू वडा घरी तयार होईल. शिवाय आकाराने परफेक्ट तयार होतील(Trick to make perfect medu vada).
उडपीस्टाईल मेदू वडा करण्यासाठी लागणारं साहित्य
उडीद डाळ
पाणी
हिरवी मिरची
आलं
तांदुळात सतत पोरकिडे, अळ्यांचं साम्राज्य? ५ झटपट उपाय, तांदूळ टिकतील वर्षभर
खोबऱ्याचे तुकडे
मीठ
तेल
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप उडीद डाळ घ्या. त्यात कपभर पाणी घालून डाळ धुवून घ्या. नंतर त्यात २ कप पाणी घालून ७ तासांसाठी भिजत ठेवा. आपण रात्रभर डाळ भिजत ठेवू शकता. नंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली उडीद डाळ आणि थोडे पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. पाणी जास्त घालू नये, अन्यथा वडे तयार होणार नाहीत.
पेस्ट तयार केल्यानंतर एका मोठ्या परातीत किंवा बाऊलमध्ये काढून घ्या. व्हिस्करने बॅटर ५ ते १० मिनिटांसाठी फेटून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं, ओल्या खोबऱ्याचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
एक जुडी पालक-कपभर बेसन, भोगीनिमित्त घरीच करा पालकाच्या अख्ख्या पानांची कुरकुरीत भजी
दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. अनेकांना मेदू वड्याला डोनटसारखा आकार द्यायला जमत नाही. अशावेळी हाताला पाणी लावा, आणि थोडे बॅटर घेऊन मेदू वड्याचा आकार द्या. या ट्रिकमुळे बॅटरला मेदू वड्यासारखा आकार देता येईल. जर तरीही आकार देताना गडबड होत असेल तर, हाताला पाणी लावून थोडे बॅटर घ्या. एका स्टीलच्या प्लेटला तेल लावा, त्यावर बॅटर ठेवून डोनटसारखा आकार द्या, आणि गरम तेलात सोडा. दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे मेदू वडे खाण्यासाठी रेडी. आपण हे वडे चटणी-सांबारसोबत खाऊ शकता.