१८ सप्टेंबर पासून पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे (Urad Vada). हिंदू धर्मात श्राद्ध पक्षाला म्हणजेच पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. या काळात विविध प्रकारचे पदार्थ तयार करून पितरांसाठी प्रसाद तयार केला जातो (Food). पितृपक्षात अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जात असले तरी उडीद डाळ वडा हा पितृपक्षाचा (Pitru Paksha) खास पदार्थ आहे. त्याशिवाय श्राद्धाचे ताट अपूर्ण मानले जाते (Cooking Tips).
पण काही वेळेस उडीद डाळ वडे करताना फसतात. किंवा वडे तेल फार पितात. काहींना वड्यांना आकार द्यायला जमत नाही. जर आपलेही उडदाच्या डाळीचे वडे फसत असतील, व्यवस्थित जमत नसतील तर, या पद्धतीने वडे करून पाहा. अगदी काही मिनिटात कुरकुरीत वडे तयार होतील(Trick to make perfect medu vada || hotel style crispy medu vada).
उडदाच्या डाळीचे वडे करण्यासाठी लागणारं साहित्य
उडीद डाळ
पाणी
हिरवी मिरची
आलं
जिरं
लसूण
ओवा
हिंग
हळद
मीठ
बेकिंग सोडा
दुधापेक्षा 'या' छोट्या दाण्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त; हाडंचं काय - केस, त्वचाही चमकेल
कोथिंबीर
तेल
कृती
सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक कप उडीद डाळ घ्या. त्यात पाणी घालून उडीद डाळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात पुन्हा पाणी घाला आणि डाळ भिजत ठेवा. उडीद डाळ ४ - ५ तास भिजल्यानंतर एका बाऊलमध्ये त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची घ्या. त्यात आल्याचा तुकडा, एक चमचा जिरं, ६ - ७ लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा ओवा घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या.
सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात 'या' पद्धतीने बदाम खाल तर मिळेल पोषण; अन्यथा कर्करोग आणि..
नंतर मिक्सरच्या भांड्यात भिजलेली उडीद डाळ घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात वाटलेली हिरवी मिरचीची पेस्ट, चिमुटभर हिंग, हळद, चवीनुसार मीठ, चिमुटभर बेकिंग सोडा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून साहित्य एकजीव करा.
दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात तेल घाला. हाताला थोडे पाणी लावा. थोडं बॅटर हातावर घेऊन मेदू वड्याचा आकार द्या आणि हळूवारपणे तेलात सोडा. व दोन्ही बाजूने ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत उडदाच्या डाळीचे वडे रेडी.