भारतीयांच्या रोजच्या जेवणात चपाती असते. चपाती भाजी खाल्ल्याशिवाय अनेकांचे पोटच भरत नाही तर काहींना चपातीपेक्षा भात जास्त खायला आवडतो. (Cooking Hacks) अनेकजण ग्लुटेन फ्री पदार्थ खातात तर काहीजण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात अशावेळी डॉक्टरांकडून इतर धान्यांच्या चपात्या खाण्याचा सल्ला दिला जातो. (5 Secrets To Make Super Soft Chapatis At Home) चपाती करताना काही बेसिक चुका केल्यामुळे त्यातील पोषक तत्व कमी होत जातात आणि शरीराला पुरेपूर फायदा मिळत नाही. अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे चपाती मऊ होत नाही पाहूया. (Tricks And Tips To Make Fluffy Chapati)
आहारतज्ज्ञ लवलीन कौर यांच्यामते मल्टीग्रेन चपात्या खाणं टाळा. एकावेळी एकाच पीठाच्या चपात्या खा. गहू, ज्वारी, नाचणी यांचे निसर्गाने वैयक्तीक महत्व प्रदान केले आहे. म्हणून तुम्हाला सर्व धान्यांचा आहारात समावेश करायचाच असेल तर प्रत्येक दिवशीची वेगवेगळ्या धान्यांच्या चपात्या किंवा भाकरी खा. (How to Keep Chapatis Soft For Several Hours)
१) नॉन स्टिक तव्यावर चपाती करू नका (Don't Use Non-Stick Pan for Chapati)
तुम्ही कोणत्याही धान्याची चपाती करत असाल तरी नॉन स्टिक तव्याचा वापर करू नका. नेहमी लोखंडाच्या तव्यावर चपाती करा. यामुळे चपाती अधिक हेल्दी बनते. मातीच्या तव्यावर केलेली चपातीही फायदेशीर ठरते.
२) एकाच धान्याची चपाती करा (Avoid Making Multigrain roti)
हेल्दी चपाती करण्यासाठी नेहमी एकाच धान्याची चपाती करा. सर्व धान्य मिसळून चपाती करू नका. यामुळे डायजेशनमध्ये समस्या येऊ शकतात. ज्वारी, बाजरी, नाचणी, मक्क्याची भाकरी आणि गव्हाच्या पिठाची चपाती तुम्ही वेगवेगळी खाऊ शकता.
३) एल्यूमिनियम फॉईलमध्ये गुंडाळू नका (Don't Use Aluminium foil For Chapati)
गरम चपाती एल्यूमिनियम फॉईलमध्ये लपटून ठेवू नका. या चपातीत फॉईल्सचे बारीक कण चिकटतात. जे सहज शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे आरोग्याला धोका उद्भवू शकतो. चपाती गुंडाळून ठेवण्यासाठी नेहमी कापडाचा वापर करा.
४) पीठ मळून जास्तवेळ ठेवू नका (Don't Keep Chapati Dough For Long Time)
जेव्हाही तुम्ही चपाती करत असाल तेव्हा ५ ते १० मिनिटांसाठी कणीक बाजूला ठेवून द्या. यामुळे चपातीचे पीठ व्यवस्थित सेट होते. यात गुड बॅक्टेरियाज असतात. ज्यामुळे चपाती सॉफ्ट आणि फुललेली बनते.
५) चपात्या मऊ राहण्यासाठी काय करावे? (How to Make Chapati Soft For Long Time)
१) कणीक मळताना त्यात थोडं तेल घाला जेणेकरून चपात्या मऊ राहील. ज्यामुळे चपात्या भाजायला जास्तवेळ लागणार नाही आणि मॉईश्चर टिकून राहिल्यामुळे पोळी लवकर कडक होणार नाही.
पनीर-दूधापेक्षा जास्त प्रोटीन असलेले ५ व्हेज पदार्थ; रोज खा, अशक्तपणा कमी करण्याचा सोपा मार्ग
२) घाईघाईत पीठ मळताना बरेच लोक पाण्याचे प्रमाण चुकवतात. पीठ मळण्यासाठी १० मिनिटांचा वेळ घ्या. त्यानंतर थोडावेळासाठी सुती कापडाने कणीक झाकून ठेवा.
रात्री पोटभर भात खाल्ला तरी पोट सुटणार नाही, भातासोबत खा ‘हा’ पदार्थ, पारंपरिक सोपा उपाय
३) चपाती शेकायला तुम्ही किती वेळ लावता याकडे लक्ष द्या. दोन्ही बाजूंनी एकदा शेकल्यानंतर तिसऱ्यांदा तुम्ही थेट आचेवर चपाती शेकवू शकता.