Lokmat Sakhi >Food > ताज्या पोळ्या तासाभरात कडक-वातड होतात? कणिक 'या' पाण्याने भिजवा; परफेक्ट चपात्यांचं सिक्रेट

ताज्या पोळ्या तासाभरात कडक-वातड होतात? कणिक 'या' पाण्याने भिजवा; परफेक्ट चपात्यांचं सिक्रेट

Tricks and tips to make fluffy Chapatis : सकाळी केलेल्या चपात्या रात्रभर फ्रेश आणि सॉफ्ट राहतील, फक्त कणिक मळताना..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2024 05:06 PM2024-04-19T17:06:03+5:302024-04-19T17:49:08+5:30

Tricks and tips to make fluffy Chapatis : सकाळी केलेल्या चपात्या रात्रभर फ्रेश आणि सॉफ्ट राहतील, फक्त कणिक मळताना..

Tricks and tips to make fluffy Chapatis | ताज्या पोळ्या तासाभरात कडक-वातड होतात? कणिक 'या' पाण्याने भिजवा; परफेक्ट चपात्यांचं सिक्रेट

ताज्या पोळ्या तासाभरात कडक-वातड होतात? कणिक 'या' पाण्याने भिजवा; परफेक्ट चपात्यांचं सिक्रेट

चपाती म्हणजे आपल्या रोजच्या जेवणातील महत्वाचा भाग आहे (Chapati Making). पोळी गोल आणि मऊ करण्यासाठी कणिक व्यवस्थित भिजवणं गरजेचं आहे. कणिक योग्य पद्धतीने भिजवली गेली तरच, पोळ्या मऊ आणि परफेक्ट तयार होतील (Cooking Tips). पण कणिक नीट मळली गेली नाही तर, चपात्या मनाप्रमाणे तयार होत नाही. डाळ, भाजी कितीही चविष्ट झाली असली तरी, पोळ्यांमुळे भाजीची चव व्यवस्थित लागत नाही.

कधीकधी पोळ्या तयार केल्यानंतर, रात्रीपर्यंत कडक आणि चिवट होतात. पोळ्या कडक आणि चिवट होऊ नये म्हणून, कणिक कशा पद्धतीने भिजवावी? मऊ चपात्यांसाठी कणिक कशी भिजवावी? पाहूयात(Tricks and tips to make fluffy Chapatis).

थंड पाण्याने मळून घ्या कणिक

चपात्या रात्रीपर्यंत सॉफ्ट राहावे असे वाटत असेल तर, कणिक मळण्यासाठी आधी पीठ परातीत चाळून घ्या. एका बाऊलमध्ये थंड पाणी घ्या. त्यात ६ ते ७ बर्फाचे तुकडे घाला. थंड पाण्याने कणिक मळून घ्या. थंड पाण्याने कणिक मळल्यानंतर चपात्या सॉफ्ट होतात. कणिक मळून झाल्यानंतर एक चमचा तेल लावून पुन्हा मळून घ्या, आणि एका सुती ओल्या कापडाने कणिक झाकून ठेवा. १० मिनिटानंतर या कणकेच्या चपात्या लाटून-भाजून घ्या. चपात्या रात्रभर मऊ आणि फ्रेश राहतील.

इडली दडस होते-डोसे तव्याला चिकटतात? पिठात घाला एक पान; इडली-डोसे होतील परफेक्ट

चपात्या रात्रभर मऊ राहण्यासाठी टिप्स

- कणिक मळण्यापूर्वी परातीत गव्हाचं पीठ चाळून घ्या. यामुळे कणिक सॉफ्ट मळून तयार होईल.

मिक्सरच्या भांड्यात कोण ढोकळा करते? पाहा ही युक्ती, करा जाळीदार हलका ढोकळा

- आपण कणिक मळण्यासाठी कोमट पाण्याचा देखील वापर करू शकता. यासाठी कोमट पाण्यात थोडे मीठ घालून कणिक मळून घ्या. यामुळे चपात्या छान फुलतील. त्याव्यतिरिक्त कणिक मळताना आपण थोडे दूध देखील मिसळू शकता.

- कणिक मळून झाल्यावर त्यावर थोडे तूप किंवा तेल लावा. नंतर १० ते १५ मिनिटांसाठी सेट होण्यासाठी ठेवा. या कणकेच्या चपात्या परफेक्ट टम्म फुगतात.

Web Title: Tricks and tips to make fluffy Chapatis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.