Join us

सकाळी केलेल्या पोळ्या ऑफिसला डब्यात नेल्या की दुपारपर्यंत वातड होतात? ३ टिप्स- पोळ्या राहतील मऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2024 14:15 IST

Tricks and tips to make fluffy Chapatis for Tiffin : पोळ्या बनवल्यानंतर लगेच कडक होत असतील तर, कणिक मळताना ३ गोष्टी मिसळा..

मऊ आणि फुगलेली पोळी खायला कोणाला नाही आवडत (Tiffin Recipe). गरमागरम पोळी त्यासोबत भाजी किंवा चटणी. पोट टम्म भरत नाही, तोवर आपण चपात्या खातो. पण पोळी बनवणं सोपं नाही (Chapati making). पोळी बनवण्याची प्रोसेस कणिक मळण्यापासून सुरु होते (Food). कणिक नीट मळून झाल्यानंतरच पोळ्या मऊ - लुसलुशीत तयार होतात.

बहुतांश वेळा पोळ्या कडक आणि वातड होतात (Cooking Tips). व्यवस्थित फुलत नाही. किंवा काही वेळानंतर लगेच कडक होतात. पोळ्या करताना कडक किंवा वातड होत असतील तर, काही टिप्स फॉलो करून पाहा. दिवसभर पोळ्या मऊ राहाव्या, शिवाय पोळ्या करताना कडक होय नये असे वाटत असेल तर, कणिक मळण्यापासून ते पोळ्या शेकण्यापर्यंत प्रत्येक स्टेप्स फॉलो करून पाहा. पोळ्या सॉफ्ट परफेक्ट होतील(Tricks and tips to make fluffy Chapatis for Tiffin).

पोळ्या करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

थंड बर्फाच्या पाण्याने कणिक मळून घ्या

पोळ्या अधिक काळ मऊ राहाव्या असं वाटत असेल तर, कणिक व्यवस्थित मळून घ्या. कणिक मळताना आपण पाण्याचा वापर करतो. पण बऱ्याचदा पोळ्या कडक आणि वातड होतात. पोळ्या अधिक वेळ मऊ राहाव्या असं वाटत असेल तर, बर्फ किंवा थंड पाण्याचा वापर करा. कणिक मळून झाल्यानंतर त्यावर ओला कापड ठेवा. यामुळे पोळ्या मऊ होतील. शिवाय लवकर खराबही होणार नाही.

पुऱ्या - भजी तळल्यानंतर उरलेले तेल फेकून का देता? २ युक्त्या, बघा तेलाचे काय करायचे..

मिठाचा करा वापर

कणिक मळताना परातीत आधी चवीनुसार मीठ घ्या. कणिक मळताना मिठाचा वापर केल्याने पोळ्या तव्याला चिकटत नाही. शिवाय बराच वेळ मऊ राहतात.

रेस्टॉरंटस्टाइल नूडल्स ते ही प्रेशर कुकरमध्ये? २ शिट्ट्यांमध्ये - अगदी १० मिनिटात चमचमीत नूडल्स रेडी

कणिक मळताना तुपाचा वापर करा

कणिक मळून झाल्यानंतर त्यावर तूप घाला. तुपामुळे पोळ्या अधिक वेळ मऊ राहतील. आपण दही किंवा तेलाचा देखील वापर करू शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स