सर्वांच्या लाडक्या तृप्ती डिमरची लाडकी डिश, तिने रणवीर अलाहाबादियाशी गप्पा मारताना सांगितली आहे. तिला हिमालियन पदार्थ खायला आवडतात असे ही ती म्हणाली. तृप्तीला 'चेसू भात' खायला प्रचंड आवडते असे ती म्हणाली. चला तर मग बघूया 'चेसू' म्हणजे नक्की काय ?. भारतात वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट आणि हटके पदार्थं बनवले जातात. निम्मे पदार्थ तर आपल्याला माहितीच नसतात. तर बरेचसे आपण ऐकून असतो, मात्र खाल्लेले नसतात. अशीच एक छान पहाडी डिश म्हणजे चेसू .मुळात हा एक डाळीचा प्रकार आहे. अख्खे उडीद ज्याला आपण काळी उडीद डाळ असेदेखील म्हणतो, त्या डाळीपासून हा पदार्थ बनवला जातो. उत्तराखंडातील डोंगराळ प्रदेशात हा पदार्थ बनवला जातो. बनवायला सोपा असा हा पदार्थ नक्कीच बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या.
चला तर मग जाणून घेऊया चेसूची पाककृती.
चेसूसाठी लागणारे साहित्य-उडदाची डाळ, लोखंडी कढई, तूप, हिंग, जिरे, लाल मिरची, आलं-लसुण पेस्ट, कांदा, गरम मसाला, हळद, तिखट, मीठ, पाणी, कोथिंबीर.
- सर्वप्रथम उडदाची डाळ छान परता आणि वाटून घ्या. अगदी लगदा करू नका. सरसरीत करून घ्या.-एका लोखंडी कढईत तूप घ्या. लोखंडी कढई नसेल तर दुसरी वापरा. मात्र उत्तरखंडीयांच्यामते, डाळ लोखंडी कढईत जास्त रूचकर बनते.-मोहरीच्या तेलाचाही वापर करू शकता.-तुपात हिंग घाला. पोटासाठी पचायला उडीदाची डाळ जरा जड असते. हिंगान घातल्याने पोटाला त्रास होणार नाही.
गरमागरम भाताबरोबर या डाळीचा आस्वाद घ्या. तृप्तीने सांगितल्याप्रमाणे चेसू भातावर भरपूर तूप घालून मग तो खातात. तुम्हीपण मस्त तूप भात व चेसू नक्की खाऊन बघा.