Lokmat Sakhi >Food > आले जास्त दिवस टिकावे म्हणून १ सोपी युक्ती, आले खूप दिवस टिकेल - सडणार नाही...

आले जास्त दिवस टिकावे म्हणून १ सोपी युक्ती, आले खूप दिवस टिकेल - सडणार नाही...

How to Store Ginger To Make It For Last Longer : आले जवळजवळ सगळ्याच पदार्थात वापरले जाते, त्यामुळे ते अधिक प्रमाणात साठवले जाते. परंतु ते जास्त काळ टिकवून ठेवण्याचे काही सोपे मार्ग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2023 09:21 PM2023-06-09T21:21:12+5:302023-06-09T21:38:22+5:30

How to Store Ginger To Make It For Last Longer : आले जवळजवळ सगळ्याच पदार्थात वापरले जाते, त्यामुळे ते अधिक प्रमाणात साठवले जाते. परंतु ते जास्त काळ टिकवून ठेवण्याचे काही सोपे मार्ग...

Trust These Ways To Keep Ginger Fresh For Longer | आले जास्त दिवस टिकावे म्हणून १ सोपी युक्ती, आले खूप दिवस टिकेल - सडणार नाही...

आले जास्त दिवस टिकावे म्हणून १ सोपी युक्ती, आले खूप दिवस टिकेल - सडणार नाही...

आले हे आपल्याला रोजच्या स्वयंपाकात लागतेच. गरमागरम चहा बनवण्यापासून ते आले पाक किंवा आल्याचे इतर पदार्थ बनवण्यापासून सगळ्याच गोष्टीत आले लागतेच. बाराही महिने घरात उपलब्ध असलेले आणि अगदी सहजरित्या बाजारात मिळणारे आले हे आपल्या लाखो दुखण्यांवर रामबाण उपाय आहे. आयुर्वेदात देखील आल्याला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक त्या घरात ज्या घरात आई आहे, ती आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीस खोकला, सर्दी-पडसे झाल्यास आल्याचा गरम गरम कडक काढा करून देते. रोजच्या आहारातून थोड्याफार प्रमाणात आले खाल्ले तर त्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. 

आले हे सर्वच दृष्ट्या बहुगुणी असते. परंतु ते स्टोअर करून कसे ठेवावे याबाबतीत अजूनही शंका आहेत. काहीवेळा बाजारांत आले स्वस्त दरात मिळाले म्हणून आपण एकदमच किलोंनी विकत घेतो. परंतु हे विकत घेतलेलं आले नक्की कसे स्टोअर करून ठेवावे जेणेकरून, ते चांगले बराच काळ टिकून राहील याबाबत काही गोष्टी माहित नसल्याकारणाने आले कुजून खराब होते. त्याचबरोबर आले फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवल्यास त्यातील ओलावा शोषला जाऊन ते लगेच सुकून खराब होते. आले सुकून खराब झाल्यामुळे त्यातील रस देखील निघून जातो. त्यामुळे बाजारातून विकत आणलेले आले दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी नेमके कसे स्टोअर करावे, याची योग्य पद्धत समजून घेऊ(Trust These Ways To Keep Ginger Fresh For Longer). 

आले नेमके कोणत्या पद्धतीने स्टोअर करून ठेवावे ? 

१. रूम टेम्परेचरला करावे स्टोअर :- जर आपल्याला आले एक - दोन आठवड्यात वापरायचे असेल तर ते रूम टेम्परेचरला स्टोअर करून ठेवावे. आले थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये. आले नेहमी थंड, कोरड्या आणि स्वच्छ जागेत स्टोअर करून ठेवावे. आले ओलसर ठिकाणी स्टोअर करून ठेवल्यास त्याला लगेच बुरशी लागू शकते, त्यामुळे आले कोरड्या आणि स्वच्छ जागेत नेहमी स्टोअर करून ठेवावे. 

टोमॅटोची पावडर करून ठेवा, आणि वर्षभर भाजी - आमटीला वापरा, पाहा कशी करायची पावडर...

२. आले रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे :- जर आपल्याला आल्याचे शेल्फ लाइफ वाढवायचे असेल आणि तुमच्याकडे भरपूर आले असेल तर तुम्ही ते रेफ्रिजरेटरमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता. बराचवेळा आले रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यावर सुकते किंवा ओलावामुळे कुजते, म्हणून ते नेहमी प्लास्टिकच्या पिशवीत किंवा हवाबंद कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवावे.

उडपीस्टाइल परफेक्ट डोसा होण्यासाठी पिठात घाला १ गोष्ट, युक्ती छोटी पण डोसा भारी...

आले स्टोअर करण्याची सोपी पद्धत :- 

१. आले स्टोअर करून ठेवण्यासाठी, टिश्यू पेपर टाकून झिप लॉक बॅगमध्ये आले ठेवा. यामुळे ते बराच काळ ताजे राहते.

२. आल्याचा तुकडा सोलून किंवा किसून घेतल्यानंतर लगेच वापरा, अर्धे कापलेले आले लवकर खराब होते.

३. जर तुमच्याकडे भरपूर आले असेल तर आल्याचे लहान तुकडे करून त्याची पेस्ट बनवा. यासाठी पाण्याऐवजी थोडे तेल आणि मीठ वापरावे. त्यानंतर  बर्फाच्या ट्रे मध्ये ही आल्याची पेस्ट भरून फ्रिजरमध्ये ठेवा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा त्याचा वापर करू शकता. 

४. जर आले सुकले असेल तर तुम्ही ते सुकवून भाजून घेऊ शकता आणि पावडर बनवून देखील वापरू शकता.

Web Title: Trust These Ways To Keep Ginger Fresh For Longer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न