Lokmat Sakhi >Food > श्रद्धा कपूर नाश्त्याला आवडीने खाते काकडीचा पारंपरिक पदार्थ, खायला पौष्टिक आणि चविष्ट...

श्रद्धा कपूर नाश्त्याला आवडीने खाते काकडीचा पारंपरिक पदार्थ, खायला पौष्टिक आणि चविष्ट...

Shraddha kapoor’s Favourite Cucumber/ Kakdi chi Bhakri : काकडीचे थालीपीठ हा पौष्टिक नाश्त्याचा एक उत्तम पर्याय असू शकतो, कसे बनवावे याची सोपी रेसिपी पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2024 09:19 PM2024-06-28T21:19:41+5:302024-06-28T21:27:55+5:30

Shraddha kapoor’s Favourite Cucumber/ Kakdi chi Bhakri : काकडीचे थालीपीठ हा पौष्टिक नाश्त्याचा एक उत्तम पर्याय असू शकतो, कसे बनवावे याची सोपी रेसिपी पाहूयात...

Try actor Shraddha Kapoor's favourite breakfast 'Kakdichi Bhakri', here's the recipe Shraddha Kapoor “Maharashtrian Food” “Kakdi chi Bhakri | श्रद्धा कपूर नाश्त्याला आवडीने खाते काकडीचा पारंपरिक पदार्थ, खायला पौष्टिक आणि चविष्ट...

श्रद्धा कपूर नाश्त्याला आवडीने खाते काकडीचा पारंपरिक पदार्थ, खायला पौष्टिक आणि चविष्ट...

बॉलिवूडची आशिकी गर्ल श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) ही अभिनयाप्रमाणेच खाण्याची देखील तितकीच शौकीन आहे. श्रद्धाला फिटनेससोबतच खाण्याची देखील आवड आहे. ती अनेकदा तिच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर फिटनेस आणि डाएट बद्दलचे व्हिडिओ शेअर करत असते. परफेक्ट फिटनेससाठी व्यायामासोबतच योग्य आहार घेणे महत्त्वाचे असते आणि श्रद्धा देखील हा सोपा नियम फॉलो करताना दिसते. तिने सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेकदा सांगितले आहे की ती तिच्या आहाराची विशेष काळजी घेते. श्रद्धाला घरी शिजवलेले जेवण आवडते, शूटिंगदरम्यान ती आपले जेवण घरुन पॅक करुन आणते(Shraddha Kapoor “Maharashtrian Food” “Kakdi chi Bhakri).

गेल्या काही वर्षांत श्रद्धाच्या फिटनेसमध्ये बरेच बदल झाले आहेत आणि हे तिच्या चाहत्यांनाही खूप आवडले आहेत. फिट राहण्यासाठी श्रद्धा सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण यांकडे विशेष  लक्ष देते. दिवसाची सुरुवात नाश्त्याने होते म्हणून श्रद्धा नाश्त्यामध्ये आपल्या आवडीचे हेल्दी पदार्थ खाणे पसंत करते. सकाळच्या वेळी केल्या जाणाऱ्या नाश्त्यामुळे आपल्याला दिवसभरासाठी एनर्जी मिळते, म्हणून श्रद्धा सकाळचा नाश्ता कधीही स्किप करत नाही. हल्लीच एका मुलाखतीत, श्रद्धाने तिला सकाळच्या नाश्त्यात काकडीचे थालीपीठ खायला आवडत असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत आपण काकडीची कोशिंबीर किंवा सॅलड म्हणून काकडी खाल्ली असेल. परंतु काकडीचे थालीपीठ हा पौष्टिक नाश्त्याचा एक उत्तम पर्याय असू शकतो. काकडीचे थालीपीठ बनवायचे कसे याची सोपी रेसिपी पाहूयात(Try actor Shraddha Kapoor's favourite breakfast 'Kakdichi Bhakri', here's the recipe).      

साहित्य :- 

१. काकडी - १ कप (किसलेली काकडी)
२. रवा - १ कप 
३. हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून 
४. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
५. ओलं खोबरं - २ टेबलस्पून (बारीक किसलेलं)
६. मीठ - चवीनुसार 
७.तेल - गरजेनुसार 

वाटीभर सुक्या खोबऱ्याची करा झणझणीत चटणी, तोंडी लावण्यासाठी म्हणून परफेक्ट...

कृती :- 

१. सगळ्यांतआधी काकडीची सालं काढून ती किसणीवर बारीक किसून घ्यावी. 
२. बारीक किसून घेतलेल्या काकडीमध्ये बारीक रवा, हिरव्या मिरचीची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं ओलं खोबरं व चवीनुसार मीठ घालावे. 
३. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.   

हाताला कणभर पीठ न लागता कणीक मळा, पाहा ही पीठ भिजवण्याची जादूई पिशवी...


४. तयार पिठाचे छोटे गोळे करून ते गोलाकार थापून घ्यावेत. 
५. एका पॅनला तेल लावून घ्यावे. तेलावर हे काकडीचे थालीपीठ दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावी. 

गरमागरम काकडीचे थालीपीठ खायला तयार आहे. सॉस किंवा चटणीसोबत आपण हे थालीपीठ खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.

Web Title: Try actor Shraddha Kapoor's favourite breakfast 'Kakdichi Bhakri', here's the recipe Shraddha Kapoor “Maharashtrian Food” “Kakdi chi Bhakri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.