श्रावण घेवड्याला आपण फ्रेंच बीन्स, फरसबी यांसारख्या नावाने ओळखतो. बाजारामध्ये श्रावण घेवडा जवळजवळ वर्षभर मिळत असला तरी श्रावणात तो जास्त चविष्ट लागतो. फरसबीची भाजी, पुलाव भात यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारे फरसबी खाल्ली जाते. खरं तर फरसबीच्या शेंगा खाण्याचे अनेक फायदे आहेत. फरसबी खूप आरोग्यदायी आणि शक्तिवर्धक आहे. हृदयाला निरोगी ठेवण्यात मदत करतात. डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप लाभदायी असतात. फरसबी इतकी बहुगुणी असली तरी, अनेक लोक आपल्या ताटात वाढलेल्या फरसबीच्या भाजीकडे बघून नाक मुरडतात. इतकेच नव्हे तर लहान मुलं तर या भाजीकडे ढुंकूनही बघत नाहीत. अश्यावेळी काय करता येऊ शकत ? झटपट आणि सोपी अशी फरसबीची कोशिंबीर करता येऊ शकते.
झटपट होणारी फरसबीची कोशिंबीर keertidacooks या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. चला तर मग ही सोपी रेसिपी करून घरच्यांना खाऊ घाला. फरसबीची कोशिंबीर करण्यासाठी हा व्हिडीओ पहा.(French Beans Koshimbir).
साहित्य -
१. हिरवी मिरची - १
२. कोथिंबीर - १ टेबलस्पून
३. दाण्याचं कूट - १/५ टेबलस्पून
४. लिंबाचा रस - चवीनुसार
५. किसलेलं खोबर - १/४ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार
७. साखर - चवीनुसार
कृती -
१. भाजीसाठी जशी फरसबी कापतो तशी कापून घ्या.
२. गरम पाण्यात चवीनुसार मीठ घालून त्यात फरसबी हलकेच उकडून घ्या. (संपूर्ण उकडून मऊ करू नका तिचा क्रंचीपणा तसाच राहू द्या.)
३. मिरची व मीठ खलबत्त्यात जाडसर भरडून घ्या.
४. फरसबी थंड झाल्यावर एका बाऊलमध्ये घ्या.
५. त्यावर मिरची व मिठाची जाडसर भरड, किसलेलं खोबर, दाण्याचा कूट, साखर, लिंबाचा रस घालून मिक्स करूंन घ्या.
६. सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून सर्व्ह करा.