Join us  

भेंडीची भाजी मिळमिळीत लागते, करुन पाहा भेंडीचा झणझणीत ठेचा, भेंडीच्या भाजीला नवा ट्विस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 6:16 PM

Try out new dish Bhendi ka thecha Recipe, Okra Thecha भेंडीची भाजी आवडत नाही म्हणणारेही हा ठेचा आवडीने खातील

भेंडीची भाजी खूप लोकप्रिय आहे. काहींना ही भाजी आवडते. तर काहींना नाही. भेंडीचे अनेक पदार्थ केले जातात. कुरकुरीत भेंडी, मसाला भेंडी, भेंडी फ्राय, भरली भेंडी हे पदार्थ लोकं चवीने खातात. भेंडी चिकट असल्यामुळे काही लोकं खाण्यास नाकं मुराडतात. भेंडीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फास्फोरस, आयर्न, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि कॉपर आढळते.

जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपल्याला जर भेंडीची रोजची तिच भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर भेंडीची चटणी ही हटके रेसिपी ट्राय करून पाहा. आपण आतापर्यंत अनेक प्रकारची चटणी खाऊन पाहिली असेल, पण भेंडीची चटणी हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला असेल. चला तर मग या हटके पदार्थाची कृती पाहूयात(Try out new dish Bhendi ka thecha Recipe, Okra Thecha).

भेंडीची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

भेंडी

तेल

लसणाच्या पाकळ्या

हिरव्या मिरच्या

जिरं

कांदा

भजी फार तेलकट होतात? ४ उपाय - भजी तेल पिणार नाहीत - होतील खमंग

हळद

मीठ

लिंबाचा रस

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात ७ ते ८ लसणाच्या पाकळ्या, ३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, व बारीक चिरलेली भेंडी घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेली भेंडी मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, व त्याची जाडसर पेस्ट तयार करून घ्या.

‘बिन साखरेचे’ गोड आणि पौष्टिक लाडू खाल्ले आहेत कधी? खा भरपूर, गोड खाण्याचा गिल्ट विसरा

दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यत भाजून घ्या. आता त्यात हळद व चवीनुसार मीठ घालून मिश्रण मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात भेंडीची तयार पेस्ट घालून एकजीव करा. त्यानंतर त्यात लिंबाचा रस, व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण मिक्स करा. अशा प्रकारे भेंडीची चटणी खाण्यासाठी रेडी.   

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स