Lokmat Sakhi >Food > सुरणाची भाजी खाल्ली असेल पण भजी कधी खाल्ली आहेत का? वीकेंडला करा चमचमीत सुरण भजी

सुरणाची भाजी खाल्ली असेल पण भजी कधी खाल्ली आहेत का? वीकेंडला करा चमचमीत सुरण भजी

Easy Recipe of making crispy and tasty suran or jimikand pakoda for evening snacks पावसाळ्यात करायलाच हवी सुरणाची चमचमीत भजी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 01:25 PM2023-07-07T13:25:09+5:302023-07-07T13:25:54+5:30

Easy Recipe of making crispy and tasty suran or jimikand pakoda for evening snacks पावसाळ्यात करायलाच हवी सुरणाची चमचमीत भजी..

Try out New Recipe : Elephant Foot Yam Pakode, perfect recipe for Monsoon | सुरणाची भाजी खाल्ली असेल पण भजी कधी खाल्ली आहेत का? वीकेंडला करा चमचमीत सुरण भजी

सुरणाची भाजी खाल्ली असेल पण भजी कधी खाल्ली आहेत का? वीकेंडला करा चमचमीत सुरण भजी

अत्यंत पौष्टीक आणि गुणकारी भाजी म्हणजे सुरण. बाजारात प्रत्येक ऋतूमध्ये सुरण मिळते. सुरण खाण्याचे अनेक फायदे. यात झिंक, फॉस्फरस, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए  आणि कॅल्शियम आढळते. जे शरीराच्या इतर कार्यासाठी आवश्यक आहे. सुरणाचे अनेक प्रकार आपण खाल्ले असतील. काहींना सुरणाची भाजी आवडते तर, काहींना नाही. पण आपण कधी सुरणाची भजी ट्राय करून पाहिली आहे का?

पावसाळ्याचे दिवस आहेत, सर्वत्र रिमझिम सरी बरसत आहेत. जर आपल्याला देखील या गार वाऱ्यात काहीतरी गरमागरम चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाली असेल तर, सुरणाची भजी ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा(Easy Recipe of making crispy and tasty suran or jimikand pakoda for evening snacks).

सुरणाची भजी करण्यासाठी लागणारं साहित्य

सुरण

बेसन

मीठ

लसूण

धणे - जिरे पावडर

काळी मिरी पावडर

लाल तिखट

पावसाळ्यात कांदे - बटाटे लवकर सडतात, कोंब फुटतात? ३ टिप्स, कांदे बटाटे टिकतील भरपूर

जिरं

कोथिंबीर

तेल

कृती

सर्वप्रथम, सुरण उकडून घ्या, त्यानंतर त्याचे छोटे चौकोनी काप तयार करा. दुसरीकडे एका बाऊलमध्ये ६ टेबलस्पून बेसन, चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून चेचलेला लसूण, एक टेबलस्पून धणे - जिरे पावडर, अर्धा टेबलस्पून काळी - मिरी पावडर, एक टेबलस्पून लाल तिखट, अर्धा टेबलस्पून जिरं, व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करा.

गरमागरम कुरकुरीत खमंग मूग भजी आता भर पावसात घरीच करा झटपट, टपरीवरच्या भजींपेक्षा भारी

आता पिठात पाणी घालून सरसरीत बॅटर तयार करा.  बॅटर तयार झाल्यानंतर त्यात कापलेले सुरणाचे तुकडे घालून मिक्स करा. दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात सुरणाचे काप सोडून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे सुरणाची चमचमीत भजी खाण्यासाठी रेडी. आपण ही भजी दह्याची चटणी किंवा इतर सॉससोबत खाऊ शकता.

Web Title: Try out New Recipe : Elephant Foot Yam Pakode, perfect recipe for Monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.