Lokmat Sakhi >Food > मटार सोलण्याचं काम होईल झटपट, ३ ट्रिक्स- काही मिनिटांतच मटार होतील सोलून...

मटार सोलण्याचं काम होईल झटपट, ३ ट्रिक्स- काही मिनिटांतच मटार होतील सोलून...

Try These Easy Tips & Tricks To Peel Green Peas Easily : Trick to peel green peas in minutes : How to peel the green peas fast : मटार सोला भरभर, पाहा ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 15:19 IST2025-01-08T15:13:37+5:302025-01-08T15:19:15+5:30

Try These Easy Tips & Tricks To Peel Green Peas Easily : Trick to peel green peas in minutes : How to peel the green peas fast : मटार सोला भरभर, पाहा ट्रिक...

Try These Easy Tips & Tricks To Peel Green Peas Easily Trick to peel green peas in minutes How to peel the green peas fast | मटार सोलण्याचं काम होईल झटपट, ३ ट्रिक्स- काही मिनिटांतच मटार होतील सोलून...

मटार सोलण्याचं काम होईल झटपट, ३ ट्रिक्स- काही मिनिटांतच मटार होतील सोलून...

थंडीचा सिझन म्हटलं की या ऋतूत फळं भाज्या अगदी फ्रेश मिळतात. याचबरोबर, सिझननुसार मिळणाऱ्या भाज्या तर अगदी स्वस्त आणि मस्त विकत मिळतात. भाज्यांमध्ये सध्या मटार वर्षभर विकत मिळत (Try These Easy Tips & Tricks To Peel Green Peas Easily) असले तरीही हिवाळ्यात मिळणारे मटार (Trick to peel green peas in minutes) हे अधिक जास्त फ्रेश आणि चवीला फारच सुंदर लागतात. हिवाळ्यात बाजारांत प्रत्येक भाजीच्या ठेल्यावर हिरव्यागार मटारचा छान ढिग रचलेला असतोच. हे हिवेगार मटार पाहून आपल्याला ते विकत घेण्याचा मोह आवरता येत नाही. हिवाळ्यात मटारचे अनेक पदार्थ घरोघरी तयार केले जातात(How to peel the green peas fast).

मटार उसळ, मटारचा पराठा, मटार करंजी, मटार पुलाव असे एक से बढकर एक असे पदार्थ या ऋतूत अगदी चवीने खाल्ले जातात. हिवाळ्यात मिळणारे फ्रेश, ताजे मटार पुढील वर्षभर मिळावेत यासाठी आजही काही घरात मटार एकदाच भरपूर प्रमाणात विकत आणून स्टोअर केले जातात. मटारचा सिझन हिवाळ्यात असल्याने या ऋतूत मटार स्वस्त आणि मस्त मिळतात. अशावेळी मटार भरपूर प्रमाणात विकत तर आणतो पण ते सोलून त्यातील दाणे काढण्याचे कंटाळवाणे आणि वेळखाऊ काम करायला मात्र कोणालाच आवडत नाही. अशावेळी मटार सोलून त्यातील दाणे काढण्याचे हे वेळखाऊ काम झटपट होण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवूयात. या काही झटपट ट्रिक्स वापरून आपण अगदी कमी वेळात भरपूर मटार दाणे सोलू शकतो. पाहूयात नेमकं काय करायचं ते...     

मटार सोलण्याचे वेळखाऊ काम होईल पटकन... 

१. मटार पाण्यांत उकळवून घ्या :- मटारचे दाणे सोलण्याच वेळखाऊ काम करायला कुणालाच आवडत नाही. याचबरोबर, मटार दाणे सोलण्यात बराच वेळ जातो. यासाठी मटारच्या शेंगा पटकन सोलून दाणे काढण्यासाठी मटार पाण्यांत उकळवून घ्यावेत. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते पाणी उकळवून घ्यावे. पाणी उकळल्यानंतर त्यात मटार घालावेत हे मटार २ ते ३ मिनिटे पाण्यांत हलकेच उकळवून घ्यावेत. त्यानंतर हे मटार गरम पाण्यातून काढून बर्फाच्या थंड पाण्यांत घालावेत. यामुळे मटारच्या साली मऊ पडून अगदी नरम होतील व सोलताना या साली पटकन निघून लगेच मटार सोलले जातील. 

मकर संक्रांती स्पेशल : आजी करायची त्या पदार्थांची ही घ्या यादी, लहानपणच्या आठवणींचा गोडवा...

२. पिशवीत घालून हलवा :- मटार झटपट सोलण्याचा हा देखील एक सोपा उपाय आपण करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एका प्लॅस्टिकच्या पिशवीची गरज लागणार आहे. सर्व मटार एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घ्यावे. त्यानंतर या पिशवीचे तोंड बंद करून पिशवी हाताने जोरात हलवून घ्यावी. पिशवी आणि मटारच्या साली यात घर्षण झाल्यामुळे साली अगदी सहजपणे निघतात. ज्यामुळे मटार दाणे सोलणे अगदी सहज शक्य होते. 

तिळाचे लाडू वळताना हाताला चटके बसतात? २ ट्रिक्स, चटके न बसता वळा एका आकाराचे परफेक्ट लाडू...

३. मटार फ्रिजमध्ये ठेवा :- मटार सहजपणे सोलून त्यातील दाणे काढण्यासाठी आपण फ्रिजचा देखील वापर करु शकता. यासाठी मटार सोलण्याआधी किमान २ तास तरी फ्रिजमध्ये ठेवावेत. फ्रिजमध्ये मटार ठेवल्याने त्या पाण्याने हलक्या ओल्या होतील. अशी ओली झालेली मटारची सालं फक्त हाताने दाबली तरी त्यातील दाणे अगदी सहजपणे निघतात. 

अशाप्रकारे आपण या तीन सोप्या ट्रिक्स वापरून मटारचे दाणे अगदी सहजपणे झटपट सोलू शकता.

Web Title: Try These Easy Tips & Tricks To Peel Green Peas Easily Trick to peel green peas in minutes How to peel the green peas fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.