Lokmat Sakhi >Food > १ वाटी बेसनपीठ फक्त हवं, घरीच करा कुरकुरीत कुरकुरे, विकतपेक्षा भारी-घरच्याघरी

१ वाटी बेसनपीठ फक्त हवं, घरीच करा कुरकुरीत कुरकुरे, विकतपेक्षा भारी-घरच्याघरी

Try This Amazing Homemade Kurkure Recipe विकत आणून कुरकुरे तर नेहमीच खाल्ले जातात, पण घरी कुरकुरे करण्याची ही घ्या रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 04:59 PM2023-05-29T16:59:29+5:302023-05-29T17:00:14+5:30

Try This Amazing Homemade Kurkure Recipe विकत आणून कुरकुरे तर नेहमीच खाल्ले जातात, पण घरी कुरकुरे करण्याची ही घ्या रेसिपी

Try This Amazing Homemade Kurkure Recipe | १ वाटी बेसनपीठ फक्त हवं, घरीच करा कुरकुरीत कुरकुरे, विकतपेक्षा भारी-घरच्याघरी

१ वाटी बेसनपीठ फक्त हवं, घरीच करा कुरकुरीत कुरकुरे, विकतपेक्षा भारी-घरच्याघरी

लहानग्यांपासून थोरा - मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कुरकुरे खायला आवडतात. काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा झाल्यास कुरकुरे हा ऑप्शन डोळ्यांसमोर येतो. कुरकुरे खाण्याचा खवय्यावर्ग खूप मोठा आहे. पण विकतचे कुरकुरे अतिप्रमाणात खाल्ल्यास आरोग्याला हानी देखील पोहचू शकते. त्यामुळे विकतचे कुरकुरे आणून खाण्यापेक्षा घरगुती कुरकुरे करून पाहा.

कुरकुरे दिसायला आकर्षक व चवीला चटपटीत लागतात. अनेकांना असे वाटते की, कुरकुरे बनवणे खूप कठीण आहे. परंतु, कुरकुरे बनवणे कठीण नसून कमी साहित्यात तयार होते. आपण एक कप बेसनचा वापर करून देखील कुरकुरे तयार करू शकता. चला तर मग या चटपटीत पदार्थाची कृती पाहूयात(Try This Amazing Homemade Kurkure Recipe).

कुरकुरे करण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

तांदळाचे पीठ

लाल तिखट

पाणी

आता १० वेळा मिक्सर लावण्याची गरज नाही, करून ठेवा इन्स्टंट ग्रीन चटणी प्रीमिक्स, पाणी मिसळताच तयार होईल चटणी

तेल

चाट मसाला

मीठ

अशा पद्धतीने करा कुरकुरे

कुरकुरे करण्यासाठी एका भांड्यात एक कप बेसन घ्या. त्यात दीड कप- तांदळाचे पीठ, १ चमचा लाल तिखट घालून चांगले मिक्स करा. नंतर त्यात हळूहळू पाणी घालून घट्ट पीठ तयार करा. पीठ करत असताना लक्षात ठेवा की पीठ जास्त पातळ नसावे अन्यथा कुरकुरे क्रिस्पी होणार नाहीत.

कांदा चिरताना डोळ्यातून घळाघळा पाणी येतं? ५ उपाय, कांदा रडवणार नाही, बारीक चिरला जाईल

आता एका साच्यात कुरकुरेसाठी बनवलेले पीठ घालून साचा बंद करा. दुसरीकडे कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात लांब आकाराचे कुरकुरे पाडून घ्या. व हे कुरकुरे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. कुरकुरे तळून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या, त्यात वरून चाट मसाला, व चवीनुसार मीठ किंवा आवडीचा कोणताही मसाला घालून मिक्स करा. व हे कुरकुरे एका हवाबंद डब्यात झाकून ठेवा. अशा प्रकारे कुरकुरे खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Try This Amazing Homemade Kurkure Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.