Join us

दही मस्त घट्ट लावण्याची ‘ही’ ट्रिक पाहा, फक्त १५ मिनिटांत दही विरजण्याची युक्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2025 17:03 IST

Tips & Tricks If Curd Didnt Set Overnight : Try This Easy Trick To Get Thick & Perfect Curd In 15 Minutes In Morning With Simple Hot Water Hack : How To Set Thick Curd in 15 minute : How to make Thick Curd in just 15 Minutes : दही लावताना झालेल्या चुकांमुळे जर दही पातळ झाले किंवा व्यवस्थित सेट नाही झाले तर वापरुन बघा ही खास ट्रिक...

उन्हाळयात हमखास आपण सगळेच दही खाणं पसंत करतो. या ऋतूंत वाढत्या उष्णतेमुळे शरीराला आतून थंडावा देण्यासाठी दही खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. आजही अनेक घरांमध्ये बाहेरुन दही विकत न आणता ,घरातच तयार केले जाते. घरच्या घरी दही तयार करताना अनेक गोष्टींची विशेष (How to make Thick Curd in just 15 Minutes) काळजी घ्यावी लागते. घरगुती (How To Set Thick Curd in 15 minute) पद्धतीने दही तयार करताना जर लहानशी जरी चूक झाली तरी दही बिघडू शकते. घरात दही लावताना विकतसारखे घट्ट दही तयार होत नाही, अशी अनेक गृहिणींची तक्रार असते. यासोबतच, कितीही मेहनत, काळजी घेऊन दही तयार केले तरी काहीवेळ हे दही तयार न होता बिघडतेच(Try This Easy Trick To Get Thick & Perfect Curd In 15 Minutes In Morning With Simple Hot Water Hack).

रात्री दही लावल्यानंतर सकाळी पाहिले तर काहीवेळा हे दही तयार झालेले नसते. याचबरोबर, कधी हे दही पातळसर होते त्याला तार सुटते. अशावेळी नेमकं काय करावं सुचत नाही. असे अर्धवट तयार झालेले पचपचीत दही पाहून ते फेकून द्यावेसे वाटते, परंतु असे न करता आपण काही सोप्या ट्रिक्स वापरून हे दही अगदी १० ते १५ मिनिटांत घट्ट आणि दाटसर करु शकतो. जर घरच्या घरीच दही लावताना झालेल्या चुकांमुळे जर दही पातळ झाले किंवा दही व्यवस्थित तयार नाही झाले तर अशावेळी काय ट्रिक वापरावी ते पाहूयात. 

दही १० ते १५ मिनिटांत घट्ट - दाटसर करण्याची सोपी ट्रिक... 

 जर दही पातळ झाले असेल किंवा व्यवस्थित लागले नसेल तर आपण ही भन्नाट ट्रिक वापरु शकतो. यासाठी, सर्वातआधी एक मोठं भांड किंवा खोलगट कढई घ्या. भांड इतकं मोठं घ्या की त्यात दही लावलेलं भांड अगदी सहज व्यवस्थित बसेल. मग या भांड्यात पाणी घ्यावे. दह्याचे भांडे या पाण्यांत ठेवल्यावर त्यात पाणी जाणार नाही इतक्या प्रमाणांत पाणी घ्यावे. तसेच दह्याच्या भांड्यात हे पाणी जाणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्यावी. आता या भांड्यातील पाणी गॅसच्या मंद आचेवर गरम करून घ्यावे.

चटणी है क्या? ६ चटण्यांचे पाहा सुपरहिट प्रकार, जेवणाला येईल रंगत-तोंडी लावा चटणी चटपटीत...

शिळ्या चपातीची खुसखुशीत, खमंग बाकरवडी, चहासोबत खा आणि सांगा कशी मस्त लागली चव...

पाणी हलके गरम करून घ्यावे, उकळवून किंवा जास्त गरम करुन घेऊ नये. त्यानंतर गॅस बंद करून या गरम पाण्यांत दह्याचे भांडे ठेवावे आणि वरून डिश ठेवून भांड झाकून घ्यावे. त्यानंतर किमान १० ते १५ मिनिटे दही या गरम पाण्यांत असेच झाकून ठेवावे. १५ मिनिटांनंतर जेव्हा तुम्ही झाकण उघडून पाहाल तेव्हा तुमचे दही घट्ट - दाटसर बनून तयार झालेले असेल. ही एक सोपी आणि भन्नाट ट्रिक वापरून आपण पातळ किंवा जर दही व्यवस्थित लागले नसेल तर ते घट्ट - दाटसर करु शकता. 

दही घट्ट - दाटसर होण्यासाठी लक्षात ठेवा... 

१. जर तुम्हाला कमी वेळात दही लावायचे असेल तर एका मातीच्या भांड्याला चारही बाजूंनी दही लावा. दुसऱ्या भांड्यात १ ग्लास  कोमट आणि थोडं थंड दूध, अर्धी वाटी दही मिसळून ठेवा. नंतर हळूहळू दूध दह्याबरोबर मिसळून दही मातीच्या भांड्यात घाला.  नंतर झाकून तसंच ठेवून द्या. रात्रभरात दही परफेक्ट तयार झालेलं असेल.

गव्हाचा चीक न काढता करा पांढरीशुभ्र - वर्षभर टिकणारी, उत्तम चवीची कुरकुरीत कुरडई...

यंदा वाळवणात करा वर्षभर टिकणारी दही मिरची, तोंडी लावायला खास चमचमीत पदार्थ...

२. कॅसरोलच्या मदतीने तुम्ही कमी वेळात  दही बनवू शकता.  दही बनवण्यासाठी फुल क्रिम दूध उकळवून घ्या जेव्हा  दूध व्यवस्थित उकळेल तेव्हा त्यात २ चमचे दही मिसळा. त्यानंतर एका स्वच्छ कॅसरोलमध्ये दूध आणि दही मिसळा. त्यानंतर कॅसरॉलचे झाकण घट्ट बंद करा. त्यावर मोठा टॉवेल ठेवा.  दही ३ ते ४ तासांनी तयार झालेलं असेल.

३. मायक्रोव्हेव्हमध्ये दही लावणं एकदम सोपं आहे. यासाठी कोमट दूधात दही मिसळा आणि एका भांड्यात ठेवा. जेव्हा मायक्रोव्हेट प्रीहीट होईल तेव्हा आत वाटी ठेवू द्या. मायकोव्हेव्ह बंदच राहू  द्या २ ते ३ तासांनी तुम्हाला दिसेल की दही व्यवस्थित लागले आहे.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.