भारतामध्ये अनेक रेसिपी तयार केल्या जातात. प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीचे अन्न तयार केले जाते. वैविध्य आणि नाविन्याने भरलेली अशी आपली पाकसंस्कृती आहे. (try this spinach khichdi! one pot meal for summer)मात्र कितीही वेगवेगळे पदार्थ तयार केले जात असले तरी भात हा पदार्थ संपूर्ण भारतभरात खाल्ला जातो. आमटी तयार करायची पद्धत वेगळी असेल किंवा भाताच्या जोडीला इतरही वेगळे पदार्थ तयार केले जात असतील. पण भात हा कॉमन आहे. भातामध्येही व्हरायटी असते.
विविध प्रकारे तयार केला जातो. (try this spinach khichdi! one pot meal for summer)एखादा दिवस रात्रीच्या जेवणासाठी घरी इतर काहीही तयार न करता आपण खिचडी तयार करतो. खिचडी हा पदार्थ लोकांना फार कम्फर्टींग वाटतो. खिचडी चवीला छानच लागते. अजिबात बाधत नाही. त्यामुळे आजारी असल्यावरही खिचडी खाल्ली जाते. खिचडीतही अनेक प्रकार असतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे पालक खिचडी. चवीला मस्त आणि तयार करायला अगदी सोपी.
साहित्य
पालक, लसूण, तांदूळ, तूर डाळ, चणा डाळ, मूग डाळ, मोहरी, जिरे, हिंग, कडीपत्ता, आलं, काश्मीरी लाल मिरची, लाल तिखट, मीठ, हळद, धणे जिरे पूड, पाणी, तूप/ तेल
कृती
१. एका पातेल्यामध्ये तांदूळ घ्या. चणा डाळ घ्या. मूग डाळ व तूर डाळ घ्या. सगळं छान धुऊन घ्या. वाटीभर तांदूळ घेत असाल तर, सगळ्या डाळी मिक्स करून डीड वाटी डाळ वापरा. नीट धुऊन झाल्यावर त्यामध्ये मीठ हळद टाका आणि कुकरला लावा. भात अगदी मऊ करून घ्या. फडफडीत ठेऊ नका.
२. एका पातेल्यामध्ये पाणी उकळा. त्यामध्ये पालकाचा पाला टाका आणि थोडे मीठ टाकून पालक छान शिजवून घ्या. नंतर तो गार करा. गार झाल्यावर पालक मिक्सरमधून फिरवून घ्या. त्याची घट्ट पेस्ट तयार करा.
३. एका कढईमध्ये तूप घ्या. त्यामध्ये मोहरी टाका ती छान तडतडली की जिरं टाका. हिंग टाका. कडीपत्ता टाका. आलं टाका. लसूण टाका. लसूण भरपूर वापरा. लाल मिरची टाका. धणे-जिरे पूडही वापरा. लाल तिखट टाका. सगळं छान परतून झाल्यावर तयार केलेली पालकाची पेस्ट टाका. पेस्ट आणि मसाला एकजीव करून घ्या. मग तयार केलेला भात त्यामध्ये टाका. पाणी घालून खिचडी छान एकजीव करून घ्या. वरतून जिऱ्याची व लसणाची फोडणी द्या. आणि गरमा गरम खा.