Join us  

फ्रिजमध्ये ठेवलं तरी आल्याला बुरशी लागते ? २ सोप्या ट्रिक्स, आलं टिकेल वर्षभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 12:12 PM

Try these two methods to store ginger for a long time : फ्रिजमध्ये स्टोर करून देखील आलं खराब होत, २ पद्धतींनी आलं करा स्टोर, राहील अधिक फ्रेश...

काही पदार्थ असे असतात की जे रोजचा स्वयंपाक करताना लागतात. टोमॅटो, कांदा, लसूण, आलं हे पदार्थ रोज लागणारे आहेत. कांदा - लसूण नसेल तर भाजी, आमटी, डाळ यांना फोडणी देता येत नाही. टोमॅटो नसेल तर भाजीला चव येत नाही. त्याचबरोबर आलं नसेल तर चहा किंवा आलं - लसणाची पेस्ट बनवता येणार नाही. एखादा पदार्थ बनवताना त्यात काही आवश्यक असे जिन्नस लागतात. अनेक पदार्थ बनवताना त्याला हलकासा तिखटपणा येण्यासाठी आपण त्यात आलं घालतोच. आलं - लसणाची पेस्ट, चहा, वाटण, यांसारखे पदार्थ बनवताना आलं त्यात घातलं जात(Easy Kitchen Hacks : how to properly store ginger for more than a month).

आपण सगळेच आलं कायम फ्रिजमध्ये स्टोर करुन ठेवतो. परंतु आलं फ्रिजमध्ये स्टोर करुन ठेवल्यावर काही दिवसांनी ते ओलं होऊन खराब होत. काहीवेळा या आल्याला बुरशी लागून ते सडून जाते. अशावेळी जर दोन सोप्या पद्धतीने आपण आलं स्टोर (Try This Unexpected Way to Store Fresh Ginger in the Fridge) करून ठेवलं तर ते दीर्घकाळ चांगले टिकते. पावसाळ्यात आलं खराब होऊ नये म्हणून स्टोर करून ठेवण्याच्या दोन पद्धती पाहूयात(How to store Ginger 2 different ways).   

आलं स्टोर करुन ठेवण्याच्या २ सोप्या पद्धती :- 

१. सर्वातआधी आलं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. आल्यावर असणाऱ्या अतिरिक्त मातीमुळे त्यात ओलावा राहतो, तसेच याच मातीमुळे आलं लवकर खराब होत. यासाठीच आलं दीर्घकाळ स्टोर करुन ठेवण्यासाठी त्यावरील माती संपूर्णपणे काढून ते स्वच्छ करुन मगच स्टोर करून ठेवावं. आलं स्वच्छ धुवून त्यावरील माती काढल्यावर एका सुती कपड्यावर किंवा चाळणीमध्ये ठेवून ते ३ ते ४ तास उन्हात ठेवावं. उन्हात ठेवायचे नसल्यास आपण ते असच वाळायला ठेवू शकतो. आलं संपूर्णपणे वाळून कोरड झाल्यावर मग ते फ्रिजमध्ये स्टोर करुन ठेवावं. जर आपण आल्यावरील माती न काढता आहे तसेच फ्रिजमध्ये स्टोर केले तर ते काही दिवसातच खराब होते किंवा त्याला बुरशी लागते. परंतु ते स्वच्छ धुवून मग फ्रिजमध्ये ठेवल्यास ६ महिने तरी ते चांगले टिकते. आलं स्वच्छ धुवून घेतल्यावर ते फ्रिजमध्ये स्टोर न करता बाहेर ठेवले तरीही ते किमान १५ दिवस चांगले टिकते. 

पावसाळ्यात कांदे लवकर खराब होऊ नयेत म्हणून ५ टिप्स, घरातला कांदा सडणार नाही...

२. आल्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. त्यानंतर एका भांड्यात पाणी घेऊन आलं स्वच्छ धुवून त्यावरील माती काढून घ्यावी. त्यानंतर सुरीने आल्याचे छोटे - छोटे तुकडे करून घ्यावेत. हे छोटे तुकडे मिक्सरला लावून बारीक करून घ्यावेत. मिक्सर मधून आल्याची जाडसर अशी पूड करून घ्यावी. आता एका मोठ्या डिशमध्ये ही पूड काढावी. त्यानंतर ही डिश उन्हात ठेवून आलं चांगलं वाळवून घ्यावे. आल्याची ही पूड उन्हात व्यवस्थित वाळल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरला लावून एकदम बारीक पावडर होईपर्यंत ग्राइंड करुन घ्यावे. ही आल्याची पावडर एका हवाबंद डब्यात भरुन फ्रिजमध्ये स्टोर करुन  ठेवावी. ही आल्याची पावडर वर्षभर चांगली टिकते. 

ना स्टफिंग, ना कणिक मळायची झंझट तरीही झटपट बनवा चविष्ट पनीर पराठा.... गरमागरम पराठा खायला तयार...  

अशाप्रकारे आपण या दोन सोप्या पद्धतीने आलं दीर्घकाळासाठी फ्रिजमध्ये स्टोर करुन ठेवू शकतो.

टॅग्स :अन्नकिचन टिप्स