Join us  

लोणच्याचा खार उरला असेल, तर या चटपटीत रेसिपीज लगेच ट्राय करून बघा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 3:52 PM

आतापर्यंत बऱ्याच जणींचे कैरीचे टेस्टी- टेस्टी, यम्मी लोणचे करून झाले असेलच. लोणच्याच्या खारामध्ये मुरत आलेल्या कच्च्या पक्क्या फोडी खाऊन तोंडाला अधिकच पाणी सुटले असणार. कारण लवंग, हिंग, मोहरीची डाळ, विलायची, बडीशेप, जीरे या पदार्थांपासून बनवलेला लोणच्याचा मसाला चमचमीतच असतो. म्हणूनच  लोणचे घातल्यावरही जर खार उरला असेल आणि आता त्याचे काय करावे ?, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हे नक्की वाचा. कारण या खारापासून अशा काही चटपटीत रेसिपी बनविता येतात, ज्या खाऊन आलेले पाहूणे आणि घरची मंडळी तृप्त होऊन जातात. 

ठळक मुद्देआजारपणामुळे जर कुणाच्या तोंडाची चव गेली असेल तर लोणच्याच्या खारापासून बनलेले हे पदार्थ नक्की चाखायला द्या.या झकास पाककृतींमुळे उरलेला खार वायाही जात नाही आणि काहीतरी चमचमीत पदार्थ बनविल्याचे समाधानही मिळते.

लोणच्याचा खार बनविताना वापरले जाणारे पदार्थ थोड्या फार फरकाने सारखेच असले, तरी घरोघरची खार बनविण्याची पद्धत वेगवेगळी असते. पिढ्यानपिढ्यांपासून ही पारंपरिक पद्धत चालत आल्याने प्रत्येक घरच्या लोणच्याचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. म्हणूनच मोठ्या मेहनतीने केलेला हा मसाला उरला तर याचे काय करावे, म्हणून अनेक महिला गोंधळात पडतात. शिवाय हा मसाला स्पाईसी असल्याने नुसताच चटणीसारखा खाणे किंवा भाजीमध्ये टाकून खाणे अनेक जणांना सहन होत नाही.  म्हणून वेगवेगळ्या पदार्थांमध्ये जर लोणच्याचा मसाला नजाकतीने टाकला तर निश्चितच पदार्थ कसा अधिक चवदार होऊ शकतो, हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांच्यासह इतर काही मंडळींनी सांगितले आहे.

१. आचारी मठरीरवा, मैदा या पदार्थांचा वापर करून करण्यात येणारी मठरी दुपारच्या चहासोबत खायला अनेक जणांना  आवडते. मेथी मठरी, पालक मठरी असे मठरीचे विविध फ्लेवर्सही असतात. अशाच प्रकारचा पिकल फ्लेवर असणारी आचारी मठरीदेखील तुम्ही करू शकता. आचारी मठरी बनविण्याची पद्धत अतिशय सोपी आहे.  यामध्ये मठरी बनिवण्यासाठी जे पीठ वापराल, त्या मिश्रणात उरलेला लोणच्याचा खार टाकून द्या.  चटपटीत आचारी मठरी झाली तयार !

 

२. यम्मी यम्मी पुरीटम्म फुगलेल्या खमंग पुऱ्या गरमागरम खाण्याचा आनंद काही वेगळाच. पुऱ्यांच्या रेसिपीमध्ये जरा लोणच्याचा खार टाका आणि मग त्यांची चव चाखून बघा. या पुऱ्यांसोबत तुम्हाला सॉस, भाजी, लोणचे असे  काहीच लावून खाण्याची गरज नाही. गरमागरम पुरी झाली की, त्याचा रोल बनवून  मुलांना द्या. मुलेही आवडीने या यम्मी यम्मी पुऱ्या फस्त करतील. अशाच पद्धतीने तुम्ही पराठेही बनवू शकता.

३. चुरमुरे आणि लोणच्याचा खारचार- पाच वाजता काय खावे, असा प्रश्न अनेक जणांना पडतो. कारण ही वेळच अशी असते की, फार भुक लागत नाही, पण काहीतरी लाईट खाण्याची इच्छा होते. अशावेळी खाण्यासाठी ही चटपटीत रेसिपी नक्की करून बघा. एका बाऊलमध्ये चुरमुरे घ्या. यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, सिमला मिरची, कोबी यासारख्या  तुमच्या आवडीनुसार भाज्या टाका. आता लोणच्याचा उरलेला खार एक चमचा तेल टाकून थोडा पातळ करून घ्या आणि तो मुरमुऱ्यांमध्ये टाकून व्यवस्थित हलवा. चटकदार मुरमुऱ्यांचा आनंद घ्या.

४. सॅलडमध्ये टाका लोणच्याचा खारकाकडी, बीट, कांदा, गाजर, सिमला मिरची, कोबी अशा तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या बारीक चिरून घ्या. या कच्च्या भाज्या एका बाऊलमध्ये टाकून घ्या. त्यामध्ये एक ते दोन चमचे दही आणि तेवढाच लोणच्याचा खार टाका. मस्तपैकी हलवून घ्या. चवीनुसार मीठ टाका आणि ही चटपटीत कोशिंबीर जेवणासोबत सर्व्ह करा.

 

५. पनीर आणि लोणच्याचा खार.. अहाहा..पनीर, सिमला मिरची, कांदा आणि इतर भाज्या मॅरिनेटेड करून खायला अनेक जणांना आवडते. नेहमीच्या पद्धतीनुसार दही आणि डाळीचे पीठ टाकून मॅरिनेट करताना या मिश्रणात लोणच्याचा खार आवर्जून टाका. खार टाकून या भाज्या अर्धा तास मॅरिनेट होऊ द्या आणि त्यानंतर त्या गॅसवर भाजून घ्या. लोणच्याच्या खारासह मॅरिनेट केलेले पनीर आणि भाज्या लाजवाब चव देतात. 

ही रेसिपी ट्राय करा, कैरीचे लोणचे होईल अधिक चटकदार

 

६. लोणचे भातकढईमध्ये तेल गरम करून फोडणी करून घ्या. या तेलात लोणच्याचा मसाला टाका. त्यात आता तुमचा भात टाकून हलवून घ्या. झाकण ठेवा आणि मस्त वाफ येऊ द्या. चवीनुसार मीठ आणि तिखट टाकून घ्या. गरमागरम लोणचे भाताची ही चटपटीत रेसिपी झाली तयार. 

टॅग्स :अन्नपाककृतीआंबा