Lokmat Sakhi >Food > राजस्थानी पद्धतीची ओल्या हळदीची भाजी करण्याची सोपी रेसेपी-तोंडाला येईल चव, पारंपरिक पौष्टिक पदार्थ

राजस्थानी पद्धतीची ओल्या हळदीची भाजी करण्याची सोपी रेसेपी-तोंडाला येईल चव, पारंपरिक पौष्टिक पदार्थ

Turmeric Bhaji Recipe in Marathi : (कच्च्या हळदीची भाजी) कच्च्या हळदीत एंटी बॅक्टेरियल, एंटी फंगल गुणधर्मसाठी असतात. इन्फेक्शन आणि व्हायरसपासूही बचाव होतो. यातील करक्यूमिन एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 12:58 PM2024-01-11T12:58:38+5:302024-01-11T14:19:48+5:30

Turmeric Bhaji Recipe in Marathi : (कच्च्या हळदीची भाजी) कच्च्या हळदीत एंटी बॅक्टेरियल, एंटी फंगल गुणधर्मसाठी असतात. इन्फेक्शन आणि व्हायरसपासूही बचाव होतो. यातील करक्यूमिन एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. 

Turmeric Bhaji Recipe in Marathi : How to Make Olya Haldichi Bhaji Kachhi Haldi Bhaji Recipe | राजस्थानी पद्धतीची ओल्या हळदीची भाजी करण्याची सोपी रेसेपी-तोंडाला येईल चव, पारंपरिक पौष्टिक पदार्थ

राजस्थानी पद्धतीची ओल्या हळदीची भाजी करण्याची सोपी रेसेपी-तोंडाला येईल चव, पारंपरिक पौष्टिक पदार्थ

रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला की जेवणाला काय करावे तेच सुचत नाही.  (Raw Turmeric Recipe) अशावेळी तुम्ही ओल्या हळदीची भाजी ट्राय करू शकता. ओल्या हळदीची भाजी खाल्ल्याने रोजच्या जेवणात बदल होईल याशिवाय अनेक आरोग्यदायी फायदेसुद्धा मिळतील.ओली हळद आणि हळदीची पावडर दोन्ही आरोग्यासाठी महत्वाचे आहेत. ओल्या हळदीत करक्युमिन आणि इतर पोषक तत्व असतात. (Kachhi Haldi Bhaji Recipe)

हळद एक असं सुपरफूड (Super Food) आहे त्यात औषधी गुणधर्म आणि पोषक तत्व असतात. नियमित कच्च्या हळदीचे सेवन केल्याने गंभीर आजारांपासून बचाव होतोय यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात.  यामुळे शरीला आजारांपासून लढण्याची ताकद मिळते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते याशिवाय इम्यूनिटी वाढण्यासही मदत होते. (Haldi Ki Sabji Recipe)

कच्च्या हळदीची भाजी कशी करायची? (How to Make Olya Haldichi Bhaji)

१) सगळ्यात आधी ओली हळद स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर त्याची सालं काढून घ्या. सालं काढल्यानंतर बारीक किसणीने किसून घ्या.

२) कढईत तेल गरम करून त्यात जीरं, हिंग, मिरची घालून परतून त्यात ओल्या हळदीचा किस घाला.  त्यात दही आणि मीठ घालून पुन्हा एकजीव करून घ्या. 

३) गरम मसाला, लाल तिखट, हिरव्या मिरचीची पेस्ट,  गरम मसाला, लाल तिखट, कोथिंबीर पावडर, धणे पावडर, हिरवे मटार घाला ही भाजी चांगली  परतून घ्या. 

४) मंद आचेवर भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करा. ओल्या हळदीची भाजी तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. याशिवाय भाताबरोबर खाण्यासाठीही ही भाजी उत्तम पर्याय आहे.

५) ही चवदार रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमच्या जिभेला चव येईल इतकंच नाही तर आरोग्यालाही बरेच फायदे मिळतील.

कच्ची हळद खाण्याचे गुणकारी फायदे (Health Benefits of Turmeric)

१) जर तुम्हाला वारंवार, सर्दी खोकला होत असेल तर हा रामबाण उपाय मानला जातो. यामुळे घशातील खवखवीपासूनही आराम मिळतो.

रोजच्या जेवणात १ चमचा तिळाची चटणी हवीच, तोंडाला येईल चव आणि हाडं होतील मजबूत

२) कच्च्या हळदीच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते. याशिवाय हळदीतील करक्यूमिन पचनासंबंधित समस्या टाळते. कच्ची हळद खाल्ल्याने गॅस, एसिडीटी, अपचन, गॅस अशा समस्यांपासून आराम मिळतो. कच्ची हळद पाण्यात उकळून पिऊ शकता.

३) कच्च्या हळदीत एंटी बॅक्टेरियल, एंटी फंगल गुणधर्मसाठी असतात. इन्फेक्शन पासूही बचाव होतो. यातील करक्यूमिन एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. 

केस शेपटीसारखे निमुळते-पातळ झाले? 'हा' घरगुती पॉवरफुल हेअरस्प्रे लावा; घनदान होतील केस

४) कच्च्या हळदी प्रोटीन्स, जिंक आणि व्हिटामीन्स असतात. यात इम्यूनिटी वाढवण्यासाठी महत्वाचे असणारे गुण असतात. ज्यामुळे  कच्च्या हळदीने इम्यूनिटी वाढते आणि रोगांपासून लढण्याची क्षमता वाढते. 

Web Title: Turmeric Bhaji Recipe in Marathi : How to Make Olya Haldichi Bhaji Kachhi Haldi Bhaji Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.