Lokmat Sakhi >Food > 'हे' ४ त्रास असतील तर थंडीत हळदीचं दूध पिणं टाळाच, उगीच आजारांना द्याल आमंत्रण

'हे' ४ त्रास असतील तर थंडीत हळदीचं दूध पिणं टाळाच, उगीच आजारांना द्याल आमंत्रण

Turmeric Milk : काही शारीरिक समस्यांमध्ये हळदीचं सेवन टाळायला हवं.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 04:55 PM2022-11-11T16:55:38+5:302022-11-11T18:22:27+5:30

Turmeric Milk : काही शारीरिक समस्यांमध्ये हळदीचं सेवन टाळायला हवं.

Turmeric Milk : of turmeric milk who should not drink turmeric milk | 'हे' ४ त्रास असतील तर थंडीत हळदीचं दूध पिणं टाळाच, उगीच आजारांना द्याल आमंत्रण

'हे' ४ त्रास असतील तर थंडीत हळदीचं दूध पिणं टाळाच, उगीच आजारांना द्याल आमंत्रण

हळदीचं दूध (Turmeric Milk)  तब्येतीसाठी उत्तम असल्याचं मानलं जातं. खासकरून खोकला, ताप, सर्दी किंवा जखम झाल्यास हळदीचं दूध पिण्याच सल्ला दिला जातो. हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यासाठी, आजारांपासून लांब राहण्यासाठी हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण दूधात कॅल्शियम, व्हिटामीन बी आणि प्रोटिन्स असतात. पण काही शारीरिक समस्यांमध्ये हळदीचं सेवन टाळायला हवं. (Disadvantages of turmeric milk who should not drink turmeric milk)

रक्ताची कमतरता असल्यास हळदीचं दूध घेऊ नये

ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमरतता असते त्यांनी हळदीच्या दूधाचे (Turmeric Milk) सेवन करून नये. डॉक्टरांच्यामते हळदीच्या दूधाच्या सेवनानं शरीरात लोह व्यवस्थित शोषलं जात नाही.  त्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर वाढत नाही. अशा स्थितीत रक्ताची कमतरता भासल्यास हळदीचं दूध पिणं नुकसानकारक  ठरू शकतं.

किडनीचे आजार असतील तर हळदीचं दूध टाळावं

हळदीचे दूध किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी देखील हानिकारक आहे. वास्तविक हळदीमध्ये ऑक्सलेट असते, ज्यामुळे किडनीचा आजार अधिक गंभीर होतो. अशा स्थितीत जर तुम्ही हळदीचे दूध प्यायले तर तुमच्या किडनीच्या समस्या वाढू शकतात.

पचनाचे त्रास

ज्या लोकांना अनेकदा पोटदुखी किंवा पचनाच्या समस्या असतात त्यांनी हळदीचे दूध पिणे टाळावे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, हे दूध प्यायल्यानंतर अशा लोकांना पोट फुगणे, छातीत जळजळ होणे किंवा पोटात गॅस बनणे अशा समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत हे दूध टाळले तर बरे होईल.

लो ब्लड शुगर

कमी रक्तातील साखरेच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हळदीचे दूध पिणे म्हणजे त्रास देण्यासारखे आहे. याचे कारण म्हणजे हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी आणखी कमी करू शकते. त्यामुळे अशा लोकांचा त्रास आणखी वाढू शकतो. त्यामुळे त्यांनी हे दूध न प्याल्यास बरे होईल.

Web Title: Turmeric Milk : of turmeric milk who should not drink turmeric milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.