Side Effects Of Turmeric Milk: भारतात भरपूर लोक दुधात हळद टाकून पितात. दूध एक संपूर्ण आहार मानलं जातं. कारण यात अनेक पौषक तत्व असतात. तर हळदीचा वापर मसाला म्हणून केला जातो. मात्र, सोबतच यात अनेक औषधी गुण असतात. जखम झाली असेल किंवा सूज आली असेल तर हळदीचा वापर केला जातो. दुधात हळद टाकून पिण्याचा उपाय खूप आधीपासून केला जातो. कारण हे एक अनेक औषधी गुण असलेलं ड्रिंक आहे. पण याचे अनेक फायदे असले तरी काही स्थितींमध्ये हे नुकसानकारकही ठरू शकतं.
दुधात हळद टाकून पिण्याचे नुकसान
गर्भधारणेत टाळावं
हळद गरम असते, त्यामुळे याने पोटात उष्णता तयार होते. अशात गर्भवती महिलांनी दुधात हळद टाकून पिऊ नये. यानं गर्भपात होण्याचा धोका असतो. पित असालच तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लिव्हरची समस्या
हळद टाकलेलं दूध प्यायल्यानं लिव्हरलाही समस्या होऊ शकते. कारण गरम गुणधर्म असलेले पदार्थ या अवयवासाठी चांगले नसतात. लिव्हर कमजोर झाल्यावर शरीरात वेगवेगळ्या समस्या होतात.
पोटासंबंधी समस्या
जर तुम्ही एका दिवसात एक चमच्या पेक्षा जास्त हळद वेगवेगळ्या माध्यमातून खात असाल तर यानं पोटासंबंधी अनेक समस्या होऊ शकतात. किडनी स्टोनची समस्या असलेल्या लोकांनी दुधात हळद टाकून पिऊ नये. कारण हळदीमध्ये ऑक्सालेटचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे किडनी स्टोनची समस्या अधिक वाढू शकते. उन्हाळ्यात हळदीचा वापर कमी केला पाहिजे.
डायबिटीसमध्ये समस्या
डायबिटीसच्या रूग्णांना आपल्या खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर खूप लक्ष द्यावं लागतं. काळजी घेतली नाही तर ब्लड शुगर लेव्हल वाढते आणि वेगवेगळ्या समस्याही होतात. हळद डायबिटीसच्या रूग्णांसाठी नुकसानकारक मानली जाते. कारण यानं नाकातून रक्त येण्याचा धोका अधिक वाढतो.