Lokmat Sakhi >Food > साखर नको म्हणून गूळ खाता ? पण तुम्ही खाता आहात तो गूळ योग्य आहे का ?

साखर नको म्हणून गूळ खाता ? पण तुम्ही खाता आहात तो गूळ योग्य आहे का ?

Types of jaggery, their benefits and which one is the best : आरोग्यासाठी चांगले व फायदेशीर म्हणून गुळाचे बनलेले पदार्थ खाताय , पण नेमका गुळाचा कोणता प्रकार खावा याचा उत्तम पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2023 01:51 PM2023-10-23T13:51:56+5:302023-10-23T14:06:49+5:30

Types of jaggery, their benefits and which one is the best : आरोग्यासाठी चांगले व फायदेशीर म्हणून गुळाचे बनलेले पदार्थ खाताय , पण नेमका गुळाचा कोणता प्रकार खावा याचा उत्तम पर्याय...

Types of jaggery, their benefits and which one is the best,Different Types Of Jaggery And Their Amazing Health Benefits | साखर नको म्हणून गूळ खाता ? पण तुम्ही खाता आहात तो गूळ योग्य आहे का ?

साखर नको म्हणून गूळ खाता ? पण तुम्ही खाता आहात तो गूळ योग्य आहे का ?

सध्या सगळीकडेच सणावाराचे वातावरण पहायला मिळत आहे. गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी असे अनेक सण एकामागोमाग एक येतात. हे सण म्हटले की या सणांदरम्यान प्रत्येक सणाला गोडाधोडाचे पदार्थ बनवून खाल्ले जातात. या गोड पदार्थांचा बेत करायचा ठरलं की त्यात साखर, गुळाचा आवर्जून वापर केला जातो. असे असले तरीही आजकाल आपल्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करुन बरेचजण साखरे ऐवजी (3 Types Of Jaggery And Reasons Why You Should Switch From Regular Sugar) गूळ खाण्याला प्राधान्य देतात. साखरेऐवजी गुळाचा वापर करणे हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो(Which type of jaggery is good for your health?).

'गूळ' हा एक नैसर्गिक गोड पदार्थ आहे. जेवण बनवताना विशेषतः गोड पदार्थ बनवताना गुळाचा (Different Types of Jaggery And Why You Should Eat This Superfood Daily) हमखास वापर केला जातो. साधारणपणे उसाच्या रसापासून गूळ तयार केला जातो. तो वर्षभर बाजारात सहज उपलब्ध असतो. गुळाचे अनेक प्रकार आहेत आणि त्या सर्वांचे स्वतःचे वेगवेगळे पोषणमूल्य आहे. हेल्थ शॉटनुसार, गूळ अनरिफाइंड असतो. त्यामुळे त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतात. यामुळे तो साखरेपेक्षा जास्त आरोग्यदायी मानला जातो. गुळाचे अनेक प्रकार असतात, परंतु त्यातला नेमका कोणत्या प्रकारचा गूळ हा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो, ते पाहूयात(Types of jaggery, their benefits and which one is the best).

गुळाचे नेमके कोणकोणते प्रकार असतात ? 

१. ऊसाच्या रसापासून बनवलेला गूळ :- उसाचा गूळ हा सर्वात लोकप्रिय आणि सगळीकडे वापरला जाणारा पदार्थ आहे. हा गूळ उसाच्या रसापासून बनवला जातो. या गुळाची चव आणि पोत वेगळी आहे. त्यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजे असतात. उदाहरणार्थ, कॅल्शियम, लोह, जस्त आणि फॉस्फरस इ. याच्या सेवनानं अ‍ॅनिमियासारखे आजार टाळता येतात. उसाचा गूळ आपल्या यकृतातील अपायकारक पदार्थ काढून टाकतो आणि प्रतिकारशक्ती वाढवतो. त्याचा रंग हलका पिवळा ते तपकिरी असतो.

डाळिंबाच्या सालांचा हेल्दी, गरमागरम चहा पिऊन तर पहा, वेटलॉस पासून ते स्किन प्रॉब्लेम्सवर एकच रामबाण उपाय...

२. नारळाचा वापर करुन बनवलेला गूळ :- नारळाचा गूळ दक्षिण भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. नारळाच्या रसामध्ये अनेक आवश्यक खनिजं, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं असतात जो आपल्याला निरोगी बनवतो. नारळाचा गुळ हा आंबलेल्या रसापासून बनवला जातो. हा गूळ थोडा कडक असतो. नारळाच्या गुळामध्ये लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील मुबलक प्रमाणात आढळतं. ते आपल्या शरीरातील अ‍ॅनिमियासारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत, जे खोकला आणि सर्दी यांसारख्या आजारांवर चांगला घरगुती उपाय म्हणून उपयुक्त आहे. त्यात सोडियम, लोह आणि पोटॅशियमसारखे आवश्यक घटक असतात. ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. या गुळामध्ये पिरॅमिडच्या आकाराचा गडद तपकिरी रंगाचा गूळ बाजारात मिळतो.

उपवास करुन वजन कमी करायचं मग खा भरपूर शिंगाडा, शिंगाड्याची फळं म्हणजे तर तब्येतीसाठी वरदान...

३. खजुराचा गूळ :- पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंडसारख्या भारतातील पूर्वेकडील राज्यांमध्ये खजूराचा गूळ खूप लोकप्रिय आहे. त्याला 'पाताली गुळ' असंही म्हणतात. खजुराच्या अर्कापासून खजूर गूळ बनवला जातो. खजूराच्या अर्कामध्ये कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, लोह आणि कॅल्शियम यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात. ते आपल्या शरीरातील अनेक पोषक तत्त्वांची कमतरता भरून काढण्यास सक्षम असतात. खजूरापासून बनवलेल्या गुळाच्या सेवनानं मायग्रेनचा त्रास बरा होतो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा तोंडात सहज विरघळतो. त्याचा सुगंधही खूप छान आणि खास असतो. या सर्वांशिवाय पामिला आणि ताडीच्या रसापासूनही गूळ बनवला जातो. हे गुळाचे प्रकार अत्यंत दुर्मिळ आहेत.

उपवास असेल तर नेमके किती पाणी प्यावे ? केव्हा प्यावे ? कमी पाणी प्यायले तर काय होते पाहा...

दसरा स्पेशल : सीताफळाचा गर काढण्याची सोपी ट्रिक वापरून घरीच बनवा दाटसर, गोड बासुंदीचा झक्कास बेत...

यापैकी नेमका कोणता गूळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो ? 

नारळ असो किंवा खजूर गूळ, या सर्वांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण हे मुबलक प्रमाणांत असतात. जेव्हा तीन प्रकारच्या गुळाचा विचार केला जातो, तेव्हा खजूर गूळ हा सर्वात आरोग्यदायी मानला जातो कारण त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असतो. याशिवाय, त्यात अनेक पोषक तत्व देखील असतात, ज्यामुळे ते केवळ विविध आजारांपासून संरक्षणच करत नाहीत तर रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते. 'गूळ खाणे' हे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरीही  गुळाचे फायदे मिळविण्यासाठी, ते मर्यादित प्रमाणात खाणे खूप महत्वाचे असते.

Web Title: Types of jaggery, their benefits and which one is the best,Different Types Of Jaggery And Their Amazing Health Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.