Lokmat Sakhi >Food > परफेक्ट साऊथ इंडियन ‘कोकोनट चटणी‘ करण्याची रेसिपी, उडपीस्टाइल नारळ चटणी करा घरच्याघरी

परफेक्ट साऊथ इंडियन ‘कोकोनट चटणी‘ करण्याची रेसिपी, उडपीस्टाइल नारळ चटणी करा घरच्याघरी

Udupi Hotel style Coconut Chutney recipe इडली-डोशासोबत नारळाची चटणी हवीच, पण ती परफेक्ट साऊथ इंडियन चवीची करायची तर प्रमाण जमायला हवं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2023 03:13 PM2023-04-20T15:13:53+5:302023-04-20T15:14:56+5:30

Udupi Hotel style Coconut Chutney recipe इडली-डोशासोबत नारळाची चटणी हवीच, पण ती परफेक्ट साऊथ इंडियन चवीची करायची तर प्रमाण जमायला हवं.

Udupi Hotel style Coconut Chutney Recipe | परफेक्ट साऊथ इंडियन ‘कोकोनट चटणी‘ करण्याची रेसिपी, उडपीस्टाइल नारळ चटणी करा घरच्याघरी

परफेक्ट साऊथ इंडियन ‘कोकोनट चटणी‘ करण्याची रेसिपी, उडपीस्टाइल नारळ चटणी करा घरच्याघरी

खोबऱ्याचे आरोग्यदायी फायदे सगळ्यांनाच ठाऊक आहे. खोबऱ्याचा वापर अनेक पदार्थात केला जातो. महाराष्ट्रातील काही भागात नारळाच्या वाटणाचा वापर अनेक पदार्थात केला जातो. खोबऱ्याच्या वाटणामुळे जेवणाची रंगत वाढते. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये देखील खोबऱ्याचे वाटण मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येते.

खोबऱ्याची चटणी फक्त साऊथ इंडियन पदार्थासोबत खाल्ली जात नाही तर, इतर पदार्थासोबत देखील खाल्ली जाते. पण साऊथ इंडियन पद्धतीने खोबऱ्याची चटणी बनवणे काहींना कठीण जाते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर इडली - डोशासोबत खोबऱ्याची घट्ट चटणी मिळते. ती चटणी घरी ट्राय केल्यानंतर हॉटेलस्टाईल बनत नाही. आपल्या ही चटणी घरी बनवायची असेल तर, या काही टिप्स फॉलो करून चटणी बनवा. साऊथ इंडियन स्टाईल चटणी नक्कीच चमचमीत बनेल(Udupi Hotel style Coconut Chutney recipe ).

खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

किसलेलं ओलं खोबरं

चणा डाळ

हिरवी मिरची

आलं

लसूण

चिंच

मीठ

साखर

पाणी

डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही, करा इन्स्टंट मुरमुरे इडली.. पौष्टिक पदार्थ झटपट

फोडणीसाठी लागणारं साहित्य

तेल

जिरं

मोहरी

उडीद डाळ

कडीपत्ता

अशी बनवा क्लासिक कोकोनट चटणी

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात किसलेले ओले खोबरे घाला, त्यात एक टेबलस्पून भाजलेली चणा डाळ, हिरवी मिरची, आल्याचे बारीक काप, लसणाच्या ४ - ५ पाकळ्या, चिंच, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, व पाणी मिक्स करून मिश्रण बारीक करून घ्या. पेस्ट तयार झाल्यानंतर एका वाटीमध्ये काढून घ्या.

साऊथ इंडियन डाळ वडा बनवण्याची पारंपरिक रेसिपी, पौष्टिक आणि चमचमीत खाण्याचा आनंद

आता फोडणीसाठी, फोडणीच्या भांड्यात तेल गरम करा, त्यात जिरं, मोहरी,  उडीद डाळ, कडीपत्त्याची पाने घालून तडका द्या. हा तडका चटणीवर घालून मिक्स करा. अशा प्रकारे साऊथ इंडियन स्टाईल क्लासिक कोकोनट चटणी खाण्यासाठी रेडी.

Web Title: Udupi Hotel style Coconut Chutney Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.