इडली किंवा डोश्याबरोबर खाण्यासाठी सांबार उत्तम पर्याय आहे. (Udupi Style Sambar Recipe) साऊथ इंडियन स्टाईल सांबार घरी बनवणं सर्वांनाच जमत असं नाही. घरी बनवलेल्या सांबारची चव इडलीच्या गाड्यांवर मिळणाऱ्या सांबारसारखी नसते अशी अनेकांची तक्रार असते. (Sambar Recipe in Marathi)
घरच्याघरी हॉटेलस्टाईल सांबार बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो केल्या तर उत्तम डिश तयार होईल. सांबार हा पौष्टीक पदार्थ आहे कारण यात वेगवेगळे मसाले आणि डाळींचा समावेश असतो. (Sambar Recipe with Sambar Powder) सांबार भाताबरोबर, चपातीबरोबर, डोसा, इडली किंवा मेंदू वड्यासोबत खाऊ शकतात. (Sambar Kasa Banvaycha)
उड्डपी स्टाईल सांबार घरी कसा करावा? (Udupi Style Sambhar For Making Steps)
१) सांबार बनवण्यासाठी सगळ्यात आधी १ कप तुरीची डाळ घ्या. डाळ स्वच्छ धुवून १५ ते २० मिनिटांसाठी पाण्यात भिजवायला ठेवा. १५ मिनिटांनी डाळीतलं पाणी उपसून घ्या. धुतलेली डाळ प्रेशर कुकरमध्ये घाला. १ कप डाळीसाठी २ कप पाणी घाला. त्यात हळद आणि मीठ घालून झाकण लावून डाळ शिजवून घ्या. सांबार बनवताना डाळ नेहमीपेक्षा जास्त शिजवा. ५ ते ६ शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करा, कुकर पूर्ण थंड झाल्यानंतरच उघडा तोपर्यंत सांबार मसाला तयार करून घ्या.
हलवायासारखी खुसखुशीत बालूशाही घरीच करा; फक्त ३ वस्तूंनी बनेल परफेक्ट-रसरशीत बालूशाही
२) सांबार मसाला बनण्यासाठी एका तव्यात १ चमचा जीरं, १ चमचा धणे, १ चमचा मोहोरी, १ चमचा उडीदाची डाळ, १ चमचा चण्याची डाळ, ४ ते ५ लाल मिरच्या, १० ते १५ कढीपत्त्याची पानं, १० ते १२ काळी मिरी, १ छोटा चमचा मेथीचे दाणे, त्यात सुक्या खोबऱ्याचे काप घालून ५ ते १० मिनिटं मंद आचेवर सर्व साहित्य भाजून घ्या. मसाल्यांचा सुगंध आल्यानंतर आणि डाळीचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करा. हे पदार्थ थंड करून मिक्सरच्या भांड्यात घाला. त्यात अर्धा छोटा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद पावडर घालून दळून घ्या. तयार आहे सांभार मसाला.
३) सांबार बनवण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम होताच राईचे दाणे, सुकी लाल मिरची, कढीपत्ता घाला. नंतर लांब चिरलेला कांदा घालून परतवून घ्या. त्यानंतर सर्व भाज्या घाला, यात बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली दूधी, बारीक चिरलेला भोपळा, शेवग्याच्या शेंगाचे काप घाला.
कुरकुरीत भेंडी फ्रायची सोपी रेसिपी-एकदा ट्राय करा, भेंडीला नाक मुरडणारेही आवडीने खातील
४) मंद आचेवर हे पदार्थ शिजवून घ्या. नंतर त्यात १ ते २ टेबलस्पून चिंचाचे पाणी घाला. त्यानंतर अर्धा कप पाणी घालून पुन्हा भाज्या शिजवून घ्या. नंतर त्यात चमचाभर लाल तिखट, चमचाभर हळद घालून एकजीव केल्यानंतर तयार सांभार मसाला २ ते ३ चमचे घाला.
५) मसाला भाज्यांमध्ये एकजीव केल्यानंतर त्यात शिजवून घोटून घेतलेली डाळ घाला. त्यात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. त्यात मीठ घालून १५ ते २० मिनिटांसाठी सांबार शिजवून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.