'वडापाव' हा जगप्रसिद्ध असा एकमेव स्ट्रीटफूडचा पदार्थ आहे. वडापाव आपण कधीही खाऊ शकतो. पांढऱ्याशुभ्र पावाला हिरवी - लाल सुकी चटणी लावून मग त्यात गरमागरम वडा ठेवून सोबत तोंडी (Ulta Vadapav Recipe) लावायला तळलेली मिरची असा हा झक्कास वडापाव सगळ्यांना आवडतोच. वडापाव (How To Make Ulta Vadapav At Home) म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत. रस्त्यावरच्या ठेल्यापासून ते मोठमोठाल्या दुकानांमध्येही वडापाव विकला जातो(Famous Ulta Vada Paav Of Maharashtra).
जसजसा काळ बदलत गेला तसे वडापावचे रुपही बदलत गेले, वडापाव वेगवेगळ्या फ्लेवर्स आणि अनेक प्रकारांमध्ये विकला जाऊ लागला. यापैकीच वडापावचा एक नुकताच फेमस झालेला प्रकार म्हणजे 'उलटा वडापाव'. आत्तापर्यंत आपण वडापाव हे नाव ऐकले असेल परंतु 'उलटा वडापाव' ही काय नवीन भानगड असेल असा प्रश्न पडला असेल. साधारणतः वडापाव म्हटलं की, पावामध्ये वडा ठेवून तो आपल्याला खायला दिला जातो, परंतु उलटा वडापाव या प्रकारात पाव हा वड्याच्या आतच रॅप केला जातो. असा हा वडापावचा नवीन प्रकार म्हणजेच 'उलटा वडापाव' घरच्याघरीच तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. तेल - २ ते ३ टेबलस्पून २. हिंग - चिमूटभर ३. कडीपत्ता - ४ ते ५ पाने ४. हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून ५. आलं - लसूण पेस्ट - - १ टेबलस्पून ६. हळद - १/२ टेबलस्पून७. धणेपूड - १/२ टेबलस्पून८. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून९. जिरेपूड - १ टेबलस्पून१०. मीठ - चवीनुसार ११. बटाटे - ५ ते ६ (उकडवून घेतलेले)१२. आमचूर पावडर - १ टेबलस्पून१३. गरम मसाला - १ टेबलस्पून१४. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली) १५. ब्रेडस्लाइस - ६ ते ७ ब्रेडस्लाइस१६. बेसन - २ ते ३ कप १७. बेकिंग सोडा - चिमूटभर१८. पाणी - गरजेनुसार
लोखंडी कढईत शिजवलेला पदार्थ काळा होतो? ६ टिप्स, मिळेल भरपूर लोह- भाजी काळीही होणार नाही...
Winter Food : गारठवणाऱ्या थंडीत खा गूळ-शेंगदाण्याचा पराठा, पोटभर नाश्ता-दिवसभर वाटेल एनर्जेटिक...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात हिंग, कडीपत्ता, हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं - लसूण पेस्ट, हळद, धणेपूड, लाल तिखट मसाला, जिरेपूड, चवीनुसार मीठ घालावे. त्यानंतर त्यात उकडवून घेतलेले बटाटे कुस्करुन घालावेत. २. आता हे सगळे मिश्रण एकजीव करुन घ्यावे. त्यानंतर या तयार मिश्रणात आमचूर पावडर, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून वड्याचे सारण तयार करून घ्यावे.
३. आता ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर ग्लासच्या मदतीने गोलाकार आकार देत ब्रेडचा गोलाकार स्लाइस कापून घ्यावा. ४. या ब्रेडच्या गोलाकार कापून घेतलेल्या स्लाइसवर हिरवी चटणी व लाल सुकी चटणी पसरवून आपल्या आवडीप्रमाणे लावून घ्यावी. ५. त्यानंतर बटाट्याच्या सारणाच्या गोलाकार खोलगट पाऱ्या तयार करून घ्याव्यात. एक पारी घेऊन त्यात गोलाकार कापून घेतलेला ब्रेड स्लाइस ठेवावा. त्यानंतर त्यावर अजून एक सारणाची तयार पारी ठेवून द्यावी. अशाप्रकारे बटाट्याच्या भाजीच्या सारणाच्या पारीत ब्रेड स्लाइस ठेवून त्याला कव्हर करून घ्यावे. ६. आता एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि पाणी घालून बॅटर तयार करून घ्यावे. या तयार बॅटरमध्ये बटाटे वडे घोळवून गरम तेलात खरपूस तळून घ्यावेत.
अशाप्रकारे पाव आत आणि बाहेरच्या बाजूला बटाट्याचे सारण असलेला उलटा वडापाव खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम उलटा वडापाव लाल सुकी चटणी आणि हिरव्या चटणी सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.