Lokmat Sakhi >Food > स्मृती इराणींनी स्वत: केले चुरमा लाडू, बघा खास रेसिपी- आणि पौष्टिक चविष्ट लाडू

स्मृती इराणींनी स्वत: केले चुरमा लाडू, बघा खास रेसिपी- आणि पौष्टिक चविष्ट लाडू

Smriti Irani Prepared Choorma Ladoo: केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी शेअर केलेली चुरमा लाडूची पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. बघा हे लाडू नेमके करतात तरी कसे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 01:45 PM2022-11-22T13:45:01+5:302022-11-22T16:38:01+5:30

Smriti Irani Prepared Choorma Ladoo: केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी शेअर केलेली चुरमा लाडूची पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. बघा हे लाडू नेमके करतात तरी कसे...

Union Minister Smriti Irani prepared Choorma Ladoo for winter, Special healthy traditional Gujarati food | स्मृती इराणींनी स्वत: केले चुरमा लाडू, बघा खास रेसिपी- आणि पौष्टिक चविष्ट लाडू

स्मृती इराणींनी स्वत: केले चुरमा लाडू, बघा खास रेसिपी- आणि पौष्टिक चविष्ट लाडू

Highlightsचुरमा लाडू अतिशय पौष्टिक असतात.थंडीमध्ये खाण्यासाठीही हे लाडू अतिशय चांगले मानले जातात.

सध्या थंडी चांगलीच सुरू झाली असून आता घरोघरी थंडीसाठीचे पारंपरिक पौष्टिक लाडू (winter special ladoos) करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक गृहिणी सध्या सुकामेवा, डिंक, मेथ्या यांची खरेदी करण्यात गुंतलेल्या आहेत. केंद्रिय मंत्री स्मृती इराणीदेखील या बाबतीत अजिबात मागे नाहीत. त्यामुळेच तर या वाढत्या थंडीत स्वत:चे आणि कुटूंबियांचे आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांनी चुरमा लाडू (Gujarati choorma ladoo recipe) बनवून ठेवले आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच गाजते आहे.(Viral post of Smriti Irani)

 

चुरमा लाडू हा एक गुजराथी पदार्थ असून हे लाडू अतिशय पौष्टिक असतात. त्यामुळे गुजराथी लोक प्रवासात हा चुरमा लाडू आवर्जून सोबत ठेवतात. थंडीमध्ये खाण्यासाठीही हे लाडू अतिशय चांगले मानले जातात.

शिल्पा शेट्टी सांगते शरीर- मन फिट ठेवण्यासाठी ३ योगासनं, बघा कशी करायची

स्मृती इराणी यांनी दोन- तीन दिवसांपुर्वी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये जो फोटो दिसत होता, त्यात एक परातीत काही चुरमा लाडू ठेवले होते आणि एक लाडू त्या हाताने वळत होत्या. 'making my stock of choorma ladoos' अशी कॅप्शनही त्यांनी या स्टोरीला दिली होती. गव्हाचे पीठ म्हणजेच कणिक, गूळ आणि तिळ हे ३ मुख्य पदार्थ असलेला पौष्टिक चुरमा लाडू तुम्हालाही करून पहावा वाटत असेल तर ही बघा रेसिपी.

 

कसा करायचा चुरमा लाडू?
१. चुरमा लाडू करण्यासाठी २ वाट्या कणिक, ४ टेबलस्पून तूप आणि अर्धा कप गरम पाणी असं मिश्रण एकत्र करून भिजवून घ्या.

डोकं सारखं दुखतं? ६ पदार्थ खाल्ल्यामुळे वाढू शकते डोकेदुखी, वाचा आहारतज्ज्ञांचा सल्ला

२. कणिक १५ ते २० मिनिटे भिजू द्या. त्यानंतर त्याचे ८ गोळे करा आणि कढईमध्ये तूप किंवा तेल टाकून ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या.

३. तळलेले कणकेचे गोळे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या. नंतर ते एका बाऊलमध्ये काढा. त्यात १ वाटी गुळाचा पाक आणि अर्धा कप तूप घाला. सगळे मिश्रण व्यवस्थित मळून घ्या आणि त्याचे लाडू बांधा. 

 

Web Title: Union Minister Smriti Irani prepared Choorma Ladoo for winter, Special healthy traditional Gujarati food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.