Join us

मूठभर मेथी-कपभर ताक, करा ‘मेथी कढी’, चव अशी की मारावा मस्त भुरका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2025 16:47 IST

Methi kadhi Recipe : How To Make Methi Kadhi At Home : Methi kadhi Recipe : Fenugreek leaves kadhi Recipe : Unique & Healthy Methi Ki Kadhi recipe : हिवाळ्यात करा मूठभर मेथीच्या पानांची चटपटीत मेथी कढी... मेथी कढीची झटपट सोपी रेसिपी...

आपल्या रोजच्या जेवणात भात किंवा चपाती सोबत डाळ, भाजी, आमटी असे अनेक पदार्थ असतात. भातासोबत खाण्यासाठी म्हणून आपण डाळ करतो, पण नेहमी तीच ती डाळ खाऊन (Methi kadhi Recipe) कंटाळा येतो. अशावेळी आपण भातासोबत वरण, टोमॅटोचे सार किंवा तडका डाल, कढी असे अनेक पदार्थ करतो. यातील कढी हा सगळ्यांच्याच (Fenugreek leaves kadhi Recipe) आवडीचा पदार्थ. ताकाची कढी करायला सोपी आणि खायला चविष्ट लागते. डाळ खाऊन कंटाळा आला की झटपट होणारी ताकाची कढी हमखास घरोघरी तयार केली जाते(How To Make Methi Kadhi At Home).

राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात प्रामुख्याने कढी हा प्रकार फारच आवडीने खाल्ला जातो. या कढीचे देखील अनेक प्रकार आहे, वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पदार्थ वापरुन ही कढी तयार केली जाते. थंडीच्या  (Unique & Healthy Methi Ki Kadhi recipe) दिवसांत बाजारात हिरव्यागार कोवळ्या पानांची मेथीची जुडी विकायला असते. या मेथीच्या जुडीतील मूठभर पानांची मेथी कढी केली तर हमखास जेवताना सगळ्यांचेच चार घास जास्त जातील. मेथीची भाजी, कढी असे आपण नेहमीच खातो पण यंदा या गुलाबी थंडीच्या दिवसांत गरमागरम मेथी कढी नक्की करुन पाहा. मेथी कढी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात.

साहित्य :- 

१. दही - १ कप २. बेसन - २ टेबलस्पून ३. हळद - १/२ टेबलस्पून ४. पाणी - २ कप ५. तेल - २ टेबलस्पून ६. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून ७. हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून ८. कांद्याची पात - १/२ कप (बारीक चिरलेली)९. हिंग - १/२ टेबलस्पून १०. धणेपूड - १/२ टेबलस्पून  ११. मेथीची पाने - १ कप / १ जुडी १२. मीठ - चवीनुसार १३. साजूक तूप - १ टेबलस्पून १४. मोहरी - १ टेबलस्पून १५. लाल सुकी मिरची - १ १६. धणे - १ टेबलस्पून १७. कांदा - १ कप  ( उभा चिरलेला कांदा)१८. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून १९. कसुरी मेथी - १ टेबलस्पून 

१० मिनिटांत करा सोया चंक्सचा चमचमीत पराठा, सकाळचा नाश्ता - टिफिनसाठी प्रोटीनरीच हेल्दी पर्याय...

दीपिका पादुकोणला आवडतो तसा ‘रस्सम राइस’ करायचाय? ही घ्या स्पेशल साऊथ इंडियन रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एक मोठं भांड घेऊन त्यात दही ओतून घ्यावे. या दह्यात बेसन, हळद आणि गरजेनुसार पाणी घालून हे कढीचे बॅटर तयार करून ठेवावे.२. एक मोठी कढई घेऊन त्यात तेल, आलं - लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, बारीक चिरलेली कांद्याची पात, हिंग, धणेपूड, मेथीची पाने व चवीनुसार मीठ घालावे. सगळे जिन्नस ७ ते ८ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावे.  

३. मेथी शिजवून झाल्यानंतर त्यात तयार केलेलं दह्याचं बॅटर घालावे. १० ते १५ मिनिटे मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यावे. ५. या मेथी कढीला फोडणी देण्यासाठी एका छोट्या भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात मोहरी, लाल सुकी मिरची, धणे, उभा चिरलेला कांदा, लाल मिरची पावडर घालून खमंग अशी फोडणी तयार करुन घ्यावी. ही तयार फोडणी मेथी कढीत वरुन हलकेच ओतून कढीला मस्त चमचमीत फोडणी द्यावी.   ६. सगळ्यांत शेवटी तयार कढीवर कसुरी मेथी भुरभुरवून घालावी. 

 खमंग अशी मेथी कढी खाण्यासाठी तयार आहे. भात, चपाती किंवा रोटी, फुलक्या सोबत ही गरमागरम कढी खाण्यासाठी सर्व्ह करावी.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.