Lokmat Sakhi >Food > घरच्याघरी उपमा प्रीमिक्स करायची सोपी रेसिपी,प्रवासात भूक लागली तर २ मिनिटांत उपमा रेड

घरच्याघरी उपमा प्रीमिक्स करायची सोपी रेसिपी,प्रवासात भूक लागली तर २ मिनिटांत उपमा रेड

Instant Upma Premix, Ready To Cook Upma Recipe - Just Add Hot Water,Quick & Easy Breakfast Mix : झटपट रव्याच्या इंस्टंट उपमा प्रीमिक्स तयार करण्याची सोपी पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2023 09:13 PM2023-05-17T21:13:34+5:302023-05-18T14:21:05+5:30

Instant Upma Premix, Ready To Cook Upma Recipe - Just Add Hot Water,Quick & Easy Breakfast Mix : झटपट रव्याच्या इंस्टंट उपमा प्रीमिक्स तयार करण्याची सोपी पद्धत...

upma premix and 5 minute upma recipe | Upma Premix Recipe | Instant Upma Recipe | घरच्याघरी उपमा प्रीमिक्स करायची सोपी रेसिपी,प्रवासात भूक लागली तर २ मिनिटांत उपमा रेड

घरच्याघरी उपमा प्रीमिक्स करायची सोपी रेसिपी,प्रवासात भूक लागली तर २ मिनिटांत उपमा रेड

आपल्यापैकी सगळ्यांच्याच घरी नाश्त्याला पोहे आणि उपमा बरेचदा केले जातात. खरंतर पोहे आणि उपमा हा झटपट होणारा अगदी सोपा नाश्ता आहे. उपमा हा रव्यापासून बनवला जाणारा एक साधा सोपा पदार्थ आहे. सकाळच्या घाईच्या वेळी नाश्ता बनवायला वेळ नसल्यास आपण झटपट उपमा बनवून खातो. हा उपमा अगदी चुटकीसरशी झटपट तयार होणारा पदार्थ आहे. उपमा हा कमी वेळेत आणि अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात बनून तयार होतो. 

उपमा हा एक दक्षिण भारतीय रव्याचा पदार्थ असून यामध्ये कांदा, मोहरी, मिरची, उडीद डाळ, शेंगदाणे, कोथिंबीर घालून झटपट केला जातो. गडबडीच्या वेळी पटकन तयार होणारा पौष्टिक नाश्ता म्हणजे उपमा. आपण कधी प्रवासाला जातो अशावेळी नाश्ता काय न्यावा असा प्रश्न पडतो. अशावेळी आपण उपम्याचे प्रीमिक्स बनवून नेऊ शकतो. या उपम्याचे प्रीमिक्स आपण एकदम एकाच वेळी बनवून ठेवू शकतो. हे प्रीमिक्स बनवून आपण हवे तेव्हा चमचाभर घेऊन त्यात गरम पाणी ओतून पटकन उपमा बनवू शकतो. उपम्याचे प्रीमिक्स तयार करण्यासाठीची सोपी कृती लक्षात ठेवूयात.  

साहित्य :- 

१. तेल - ४ टेबलस्पून 
२. पांढरी उडीद डाळ - २ टेबलस्पून 
३. शेंगदाणे - २ टेबलस्पून 
४. काजू - १० पाकळ्या 
५. भाजून घेतलेली चणा डाळ - २ टेबलस्पून 
६. जिरे - १ टेबलस्पून 
७. मोहरी - १ टेबलस्पून
८. हिरव्या मिरच्या - ६ ते ७ (बारीक चिरुन घेतलेल्या)
९. आलं - १ टेबलस्पून (किसून घेतलेलं)
१०. कढीपत्ता - ८ ते १० पान 
११. बारीक रवा - ३ कप (भाजून घेतलेला)
१२. मीठ - चवीनुसार 
१३. साखर - १ टेबलस्पून 

ना डाळ-तांदूळ भिजवण्याची गरज, ना आंबवण्याची; १० मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचे डोसे...

फक्त २ कप रवा आणि १ ग्लास ताक, आप्पे करा मस्त - गुबगुबीत फुललेले...

कृती :- 

१. सर्वप्रथम उपमा बनवण्यासाठी एका पॅनमध्ये बारीक रवा कोरडा भाजून घ्यावा. रवा भाजून बाजूला ठेवून द्यावा. 
२. आता एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात पांढरी उडीद डाळ, शेंगदाणे, काजू, भाजून घेतलेली चणा डाळ घालून सर्व जिन्नस तेलात खरपूस परतून घ्यावे. 
३. त्यानंतर त्यात जिरे, मोहरी, हिरव्या मिरच्या, किसून घेतलेलं आलं, कढीपत्ता घालावा. 

दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत...

४. फोडणी खमंग तयार झाल्यानंतर त्यात कोरडा भाजून घेतलेला रवा घालून चमच्याने मिक्स करुन घ्यावा. सगळ्यात शेवटी यात चवीनुसार मीठ व साखर घालावी. आपले उपमा प्रीमिक्स तयार आहे. 
५. हे उपमा प्रीमिक्स थोडे गार झाल्यानंतर एका काचेच्या हवाबंद बरणीत स्टोअर करुन ठेवावे. 
६. आपल्याला जेव्हा झटपट उपमा बनवायचा असेल तेव्हा हे प्रीमिक्स एक भांड्यात घेऊन त्यात थोडे गरम पाणी ओतावे. 

अस्सल झणझणीत झुणका नाही खाल्ला तर काय मजा, गावरान झुणक्याची रेसिपी...

उपमा प्रीमिक्स पासून झटपट बनवलेला उपमा खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: upma premix and 5 minute upma recipe | Upma Premix Recipe | Instant Upma Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.