उपवासाचे नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर आता ही एक खमंग चवदार रेसिपी घ्या. उपवासाचं चमचमीत पिठलं आणि मऊसूत भाकरी (Upvas bhakari pithala recipe). असा खमंग बेत फराळाला असेल तर अगदी उपवास न करणारेही आवडीने उपवास करू लागतील (Zunka bhakari for fast). शिवाय हा पदार्थ पौष्टिक आहे आणि पचायलाही सोपा आहे. त्यामुळे उपवासाचा त्रास होत नाही आणि पोट व्यवस्थित भरतं. MadhurasRecipe या यु ट्यूब चॅनलवर ही रेसिपी शेअर करण्यात आली आहे. एकदा हा पदार्थ करून पाहा. करायला सोपा आहे तसेच अगदी झटपट होणारा...(Navaratri Fast Special Recipe)
कशी करायची उपवासाची झुणका भाकरी?
उपवासाचं पिठलं करण्याची रेसिपी
साहित्य
१ वाटी शेंगदाणे
आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो?
१ टेबलस्पून तूप किंवा तेल
फोडणीसाठी जिरे
चवीनुसार तिखट आणि मीठ
कृती
१. सगळ्यात आधी शेंगदाणे २ तास पाण्यात भिजत घाला. त्यानंतर ते मिक्सरमध्ये टाका आणि अगदी बारीक वाटून घ्या. त्यात आणखी पाणी घालण्याची गरज नाही.
दांडियाला जायचंय पण मेकअपला वेळच नाही? १० मिनिटांत होईल असा झटपट मेकअप- बघा कसा करायचा
२. त्यानंतर आता गॅसवर कढई तापायला ठेवा. त्यात शेंगदाण्याचं तेल किंवा तूप आणि जिरे घालून फोडणी करून घ्या. जिरे तडतडले की त्यात लाल तिखट घाला. तिखट तळलं गेलं की त्यात शेंगदाण्याचं वाटण टाका. ते चांगलं हलवून घ्या आणि ४ ते ५ मिनिटे चांगलं वाफवून घ्या. चवीनुसार मीठ टाका. पिठल्यावर जेव्हा तेलाचा किंवा तुपाचा तवंग येईल तेव्हा पिठलं तयार झालं असं समजावं.
उपवासाची भाकरी करण्यासाठी साहित्य
पाव कप साबुदाणा
१ कप भाकरी
चवीनुसार मीठ
कृती
१. सगळ्यात आधी साबुदाणा मिक्सरमध्ये टाकून त्याचं बारिक पीठ करून घ्या.
२. त्यानंतर भगर मिक्सरमध्ये टाकून तिचीही पावडर करून घ्या.
३. साबुदाणा आणि भगरीचं पीठ एकत्र करा आणि त्यात चवीनुसार मीठ घाला.
४. आता गरजेनुसार पाणी टाकून पीठ मळून घ्या. यानंतर पोळपाटावर थोडं पीठ टाकून भाकरी थापून घ्या आणि नेहमीप्रमाणे आपण भाकरी भाजतो तशी भाजून घ्या..
५. गरमागरम भाकरी आणि खमंग शेंगदाणा पिठल्याचा बेत उपवासासाठी तयार आहे....