Join us  

ना साबुदाणा - ना भगर, अगदी १० मिनिटांत करा उपवासाचा कुरकुरीत डोसा; पाहा इन्स्टंट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2024 10:00 AM

upvas dosa recipe | farali dosa | upvasache dose : १० मिनिटात उपवासाचा कुरकुरीत डोसा कसा करायचा पाहा..

नवरात्र म्हटलं तर, नऊ दिवस देवीचा जागर (Navratri 2024). काही लोक नऊ दिवस उपवास धरतात (Farali Dosa). नऊ दिवस उपवासाचे पदार्थ केले जातात आणि आवडीने खाल्लेही जातात (Cooking Tips). साबुदाण्याची खिचडी, वडे आणि खीर आवडीने खाल्ली जाते. साबुदाण्याची इडली आणि डोसाही केला जातो. जर आपल्याला साबुदाणा खाल्ल्यानंतर अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर, आपण साबुदाण्याचा वापर न करताही झटपट क्रिस्पी डोसा करू शकता.

साबुदाण्याचा वापर न करता डोसा करायचा असेल तर, आपण राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करूनही डोसा करू शकता. राजगिरा खाण्याचेही अनेक फायदे आहेत. जर आपल्याला राजगिऱ्याचे लाडू खायचे नसतील तर, आपण याचा डोसाही करून खाऊ शकता. अगदी काही वेळात हा कुरकुरीत उपवासाचा डोसा तयार होतो(upvas dosa recipe | farali dosa | upvasache dose).

उपवासाचा कुरकुरीत डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

राजगिऱ्याचे पीठ

सुटलेलं पोट कमीच होत नाही? 'या' पौष्टीक पीठाचे सूप प्या; वेट लॉस होईल - दिसाल सुडौल सुंदर

ताक

मीठ

कृती

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी राजगिऱ्याचे पीठ घ्या. त्यात एक वाटी ताक आणि चवीनुसार मीठ घालून मिक्सर फिरवून घ्या. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या.

सर्दी - खोकला, ॲसिडिटीचा त्रास होईल छूमंतर; फक्त चहामध्ये घाला 'ही' खास पांढरी पावडर; तब्येत सुधारेल

त्यावर झाकण ठेवा. अर्ध्या तासासाठी बॅटर भिजवण्यासाठी ठेवा. ३० मिनिटानंतर बॅटरमध्ये बेकिंग सोडा घालून मिक्स करा. गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर ब्रशने तेल लावा. चमचाभर बॅटर घ्या, आणि पॅनवर पसरवा. ज्या पद्धतीने आपण डोसा करतो. त्याच पद्ध्तिएन डोसा दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे कुरकुरीत उपवासाचा डोसा खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव २०२४अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.