Lokmat Sakhi >Food > महाशिवरात्रीला करून खा उपवासाचा डोसा, नेहमीच्या साबुदाणा खिचडी- भगरीपेक्षा काहीतरी वेगळं- चवदार

महाशिवरात्रीला करून खा उपवासाचा डोसा, नेहमीच्या साबुदाणा खिचडी- भगरीपेक्षा काहीतरी वेगळं- चवदार

How To Make Sabudana Dosa: महाशिवरात्रीच्या उपवासासाठी (mahashivratri fast) नेहमीचे तेच ते पदार्थ खाण्यापेक्षा उपवासाचा डोसा हा एक वेगळा पदार्थ खाऊन पाहा. (Upvas dosa recipe in marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2024 04:20 PM2024-03-07T16:20:39+5:302024-03-07T16:22:25+5:30

How To Make Sabudana Dosa: महाशिवरात्रीच्या उपवासासाठी (mahashivratri fast) नेहमीचे तेच ते पदार्थ खाण्यापेक्षा उपवासाचा डोसा हा एक वेगळा पदार्थ खाऊन पाहा. (Upvas dosa recipe in marathi)

Upvas dosa recipe for mahashivratri in marathi, How to make sabudana dosa, sabudana dosa for fast, sago dosa recipe | महाशिवरात्रीला करून खा उपवासाचा डोसा, नेहमीच्या साबुदाणा खिचडी- भगरीपेक्षा काहीतरी वेगळं- चवदार

महाशिवरात्रीला करून खा उपवासाचा डोसा, नेहमीच्या साबुदाणा खिचडी- भगरीपेक्षा काहीतरी वेगळं- चवदार

Highlightsआता महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त उपवासाचा डोसा हा एक वेगळा पदार्थ करून पाहा

उपवास म्हटलं की खवय्यांसाठी आनंदाचा दिवस असतो. कारण त्यादिवशी साबुदाण्याची खिचडी, साबुदाणे वडे, भगर, रताळ्याच्या फोडी असे अनेक पदार्थ केले जातात. साबुदाण्याची खिचडी, भगर- आमटी हे पदार्थ असे आहेत, जे कोणत्याही उपवासाला हमखास केले जातातच. त्यामुळे जे लोक सतत उपवास करतात, त्या लोकांना हेच पदार्थ प्रत्येक उपवासाला वारंवार खाण्याचा कंटाळा येतो ( sabudana dosa for fast). म्हणूनच आता महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त  (mahashivratri fast) उपवासाचा डोसा हा एक वेगळा पदार्थ करून पाहा (Upvas dosa recipe in marathi). या डोश्यालाच काही ठिकाणी साबुदाणा डोसा असंही म्हणतात. (sago dosa recipe)

साबुदाणा डोसा रेसिपी

 

साहित्य

अर्धा कप साबुदाणा

अर्धा कप भगर

१ बटाटा

लग्नसमारंभासाठी आर्टिफिशियल जडाऊ ज्वेलरी घ्यायची? बघा ८ सुंदर पर्याय, दिसाल एकदम देखण्या- सुंदर

पाव कप दही 

हिरव्या मिरचीची पेस्ट १ टीस्पून

दाण्याचा कूट २ टेबलस्पून

चवीनुसार मीठ

उपवासाला चालत असेल तर जीरेपूड

 

कृती

सगळ्यात आधी साबुदाणा ४ ते ५ मिनिटे मंद आचेवर थोडा भाजून घ्या. जेव्हा भाजलेल्या साबुदाण्याचा सुगंध येऊ लागेल तेव्हा गॅस बंद करा.

साबुदाणा थंड झाला की साबुदाणा आणि भगर असे एकत्रितपणे मिक्सरमधून बारीक करून घ्या.

आता साबुदाणा आणि भगरीचे मिक्सरमधून फिरवलेले पीठ एका भांड्यात काढून घ्या.

१ हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या शिमर साडी- करा चमचमत्या साडीची देखणी फॅशन

यानंतर बटाटा उकडून घ्या. त्याच्या फोडी करून मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यात अर्धा कप पाणी टाकून बटाट्याची चांगली पेस्ट करून घ्या.

बटाट्याची पेस्ट साबुदाणा- भगरीच्या पिठात टाका. त्यात दाण्याचा कूट, मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि जिरेपूड टाका. गरजेनुसार पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या.

यानंतर नेहमीप्रमाणे डोसे करतो, तसे या पिठाचे डोसे करा. उपवासाचे डोसे उपवासाच्या चटणीसोबत खाऊन पाहा. 

 

Web Title: Upvas dosa recipe for mahashivratri in marathi, How to make sabudana dosa, sabudana dosa for fast, sago dosa recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.