गुरुवारपासून मोठ्या उत्साहात, अतिशय आनंदाच्या वातावरणात नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे (Navratri 2024). आता नवरात्र म्हटले की अनेक घरांमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात. उपवासाला आपण भगर, साबुदाण्याची खिचडी, भाजणीचे थालिपीठ, बटाट्याचा किस असे पदार्थ तर नेहमीच करून खातो. पण आता यावेळी मात्र उपवासाच्या पदार्थांमध्ये थोडा बदल हवा असल्यास खमंग खुसखुशीत पुऱ्यांचा बेत करून पाहा.. उपवासाच्या पुऱ्यांची ही रेसिपी अतिशय सोपी असून घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडणारी आहे (upvas puri recipe). कधी कधी मुलांना डब्यात काहीतरी वेगळं पाहिजे असल्यास तुम्ही त्यांना या उपवासाच्या पुऱ्या करून देऊ शकता.(Aloo Puri Recipe For Navratri Fast)
उपवासाच्या पुऱ्या करण्याची रेसिपी
साहित्य
३ उकडलेले बटाटे
१ वाटी भगरीचे पीठ
२ टेबलस्पून दही
१ वाटी साबुदाण्याचे पीठ
जोर लावूनही पोट साफ होतच नाही? ३ पद्धतींनी शरीराची हालचाल करा- पोट लगेचच मोकळं होईल
२ टीस्पून मिरचीची पेस्ट
१ टीस्पून जिरेपूड उपवासाला चालत असल्यास
चवीनुसार मीठ
कृती
सगळ्यात आधी बटाटे उकडून घ्या आणि ते उकडल्यानंतर २ ते ३ तास फ्रिजमध्ये ठेवून पूर्णपणे थंड करून घ्या. यानंतर बटाटे किसून घ्या.
बटाट्याचा किस एका भांड्यात काढा. त्यामध्ये भगरीचे पीठ आणि साबुदाण्याचे पीठ टाका.
प्लास्टिकच्या टिफिनच्या डब्यांना येणारा तेलकट वास, चिकटपणा जात नाही? २ सोपे उपाय- डबे चकाचक
चवीनुसार मिरचीची पेस्ट किंवा लाल तिखट, मीठ आणि तुमच्याकडे उपवासाला चालत असल्यास थोडीशी जिरेपूड टाका.
गरम पाणी आणि दही घालून सगळे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या.
सारखं डोकं दुखतं- काय करावं सुचत नाही? बघा सोपे व्यायाम, दुखणाऱ्या डोक्याला मिळेल आराम..
यानंतर त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करा आणि त्याच्या पुऱ्या लाटून त्या तुपात किंवा उपवासाच्या तेलामध्ये खमंग तळून घ्या.
या पुऱ्या उपवासाच्या लिंबाच्या लोणच्यासोबत किंवा तशाच नुसत्या खायला देखील खूप चवदार लागतात.