नवरात्रीत उपवासाला आपण नऊ दिवस रोज वेगवेगळे पदार्थ खातो. उपवास म्हटलं की सगळ्यात पाहिला साबुदाणा आठवतो. उपवासाचा कोणताही पदार्थ करायचा म्हटलं की त्यात साबुदाणा (Upvas Spcial Recipe) वापरला जातोच. उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वडे, थालीपीठ असे पदार्थ खातो, पण रोज साबुदाण्याचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाही येतो. अशावेळी फराळ करताना ताटात काहीतरी चमचमीत, कुरकुरीत, खमंग पदार्थ असावेत असे वाटते(Sabudana Appe).
उपवास असला की हमखास घरात साबुदाण्याचे वेगवेगळे पदार्थ करण्याचा बेत आखला जातो. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत साबुदाण्याचे पदार्थ फेव्हरेट असतात. साबुदाण्यामुळे पोट लवकर भरते आणि उपवासा दरम्यान शरीराला चांगली ऊर्जा देखील मिळते. यंदाच्या उपवासाला साबुदाण्यापासून खिचडी, वडे न करता झटपट तयार होणारे साबुदाण्याचे आप्पे नक्की ट्राय करून पाहा. यासाठीच नेहमीच्याच साबुदाण्याच्या वड्याला थोडा ट्विस्ट देत चक्क साबुदाण्याचे आप्पे बनवू शकता. साबुदाण्याचे आप्पे आपण फक्त उपवासालाच नाही तर ऐरवी सकाळच्या नाश्त्याला देखील करु शकता. यामुळे नाश्त्यामध्ये एक छान पदार्थ खाण्यासाठी तयार होईल यासोबतच उपवासाला काहीतरी वेगळं नवीन खाल्ल्याचा आनंद मिळेल. साबुदाण्याचे आप्पे कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात(Upvas Special Sabudana Aappee).
साहित्य :-
१. साबुदाणा - १ कप (३ ते ४ तास भिजवलेला)२. बटाटा - १ कप (उकडवून घेतलेले)३. हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून ४. जिरे - १ टेबलस्पून ५. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून ६. मीठ - चवीनुसार ७. कडीपत्ता - ६ ते ७ पानं ८. कोथिंबीर - १/२ टेबलस्पून (बारीक चिरलेली)९. शेंगदाण्याचा कुट - १/२ कप १०. लिंबाचा रस - २ टेबलस्पून ११. तेल - ५ ते ६ टेबलस्पून
नवरात्र स्पेशल : राजगिऱ्याचा हलवा करा फक्त १० मिनिटांत, १ कप पिठाचा पोटभर खाऊ!
नवरात्र उपवास स्पेशल : प्या ‘ही’ उपवास स्मूदी-पोटही भरेल आणि डिहायड्रेशनही होणार नाही...
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा, उकडवून मॅश करून घेतलेला बटाटा, हिरव्या मिरचीची पेस्ट, जिरे, काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ, कडीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, शेंगदाण्याचा कुट, लिंबाचा रस असे सगळे जिन्नस घालावेत. २. आता हे सगळे जिन्नस एकजीव करून त्याचे मिश्रण तयार करून घ्यावे. ३. त्यानंतर आपल्या हातांच्या तळव्याला तेल लावून घ्यावे. तेल लावून या मिश्रणाचे छोटे छोटे गोलाकार गोळे तयार करुन घ्यावेत.
साबुदाणा वडा तेलात फट्कन फुटतो-उडतं अंगावर तेल? ५ चुका टाळा- भाजणारही नाही...
४. आता आप्पे पात्र घेऊन त्याला थोडे तेल लावून घ्यावे मग त्यात या तयार पिठाचे एक एक गोळे सोडावेत. ५. थोड्यावेळाने हे आप्पे परतून हळुहळु दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावेत.
उपवासासाठी साबुदाण्याचे आप्पे खाण्यासाठी तयार आहेत. दही किंवा चटणी सोबत हे आप्पे खाण्यासाठी सर्व्ह करु शकता.