उपवासासाठी भगर (Maharashtrian Fasting Recipe) हा एक सर्वोत्तम पदार्थ आहे. भगर पचायला हलकी असल्याने उपवासाच्या दिवशी भगर खाणे तब्येतीच्या दृष्टीने चांगले असते. वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी हा उपवासाच्या पदार्थांमधील एक खास पदार्थ आहे. बरेचदा आपण साबुदाणा खाऊन कंटाळा आला की उपवासाला झटपट होईल असा वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवतो. वरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी हे दोन पदार्थ खाल्ल्याशिवाय उपवास अपूर्णच आहे(Upvas Special : Varicha Bhaat & Shengdana Amti).
उपवासाला आपण खूप आवडीने वरीचा भात बनवतो. परंतु काहीवेळा हा वरीचा भात व्यवस्थित बनत नाही. कधी त्याचा गचका होतो तर कधी तो कच्चा राहतो. अशावेळी भात व उपवासाची आमटी खाण्याचा उत्साह निघून जातो. त्यामुळे काही साध्या - सोप्या टिप्स वापरून आपण वरीचा भात गचका होऊ न देता मोकळा व दाणेदार बनवू शकतो. वरीच्या भाताचा (How To Make Sama Rice) गचका किंवा लगदा होऊ नये म्हणून काही टिप्स फॉलो करुयात(Varai Bhat, Shengdanyachi Amti).
वरीचा भात करण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. साजूक तूप - २ टेबलस्पून २. जिरे - १ टेबलस्पून ३. वरीचे तांदूळ - १ कप ४. पाणी - २ कप
उपवासाची भजी खाता आली तर काय मजा ना ? करा चमचमीत उपवासाची भजी, पाहा रेसिपी...
शेंगदाण्याची आमटी करण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट - १/ २ कप २. आलं - १ लहान तुकडा३. हिरव्या मिरच्या - ३ ते ४४. किसलेलं ओल खोबर - १ वाटी ५. पाणी - गरजेनुसार६. लहान फोडी केलेला बटाटा - १ कप (बटाटा उकडवून घेतलेला)७. मीठ - चवीनुसार ८. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून९. जिरे - १ टेबलस्पून
नवरात्र स्पेशल : फक्त १० मिनिटांत करा साबुदाणा आणि भगरीच्या पीठाचे घावन, उपवासाचा झटपट चविष्ट बेत...
वरीचा भात बनवण्याची कृती :-
वरीचा भात बनवण्यासाठी एका भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात जिरे फोडणीला घालावे. जिरे फुलल्यानंतर त्यात भिजवून घेतलेली वरी घालावी. त्यानंतर साजूक तुपामध्ये ही वरई चांगली खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावी. त्यानंतर त्यात गरम पाणी घालावे. आता या भांड्यावर झाकण ठेवून ३ ते ४ मिनिटे वाफेवर भात शिजण्यासाठी मंद आचेवर ठेवून द्यावा. झाकण उघडून हा भात चमच्याने ढवळून घ्यावा. आपला वरीचा भात खाण्यासाठी तयार आहे.
उपवास करताना तब्येत बिघडू नये म्हणून कोणते मीठ खावे ? तज्ज्ञ सांगतात, मीठ खाणार असाल तर...
शेंगदाण्याची आमटी बनवण्याची कृती :-
शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, किसलेलं ओल खोबर, आलं, हिरव्या मिरच्या व गरजेनुसार पाणी घालून त्याची पातळसर पेस्ट बनवून घ्यावी. आता एका भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात जिरे, उकडलेल्या बटाटाच्या लहान फोडी, लाल मिरची पावडर, मीठ घालून घ्यावे. त्यानंतर यात मिक्सरमध्ये तयार करून घेतलेले वाटण घालावे. आता या आमटीला एक उकळी येऊ द्यावी. आपली शेंगदाण्याची आमटी खाण्यासाठी तयार आहे.
वरीचा भात मोकळा होण्यासाठी टिप्स :-
१. वरीचा तांदूळ विकत आणल्यानंतर तो किंचित ओल्या केलेल्या कापडावर पसरवून घालावा आणि स्वच्छ पुसून, सुकवून ठेवावा.
२. वरीचा भात शिजवण्याआधी तो साजूक तुपावर किंवा कोरडा हलकेच परतून घ्यावा, यामुळे तो शिजवताना त्याचा गचका न होता मोकळा शिजला जातो.
३. वरीचा भात शिजवताना त्यात गरम करून घेतलेले पाणी घालावे यामुळे भात मोकळा व दाणेदार शिजवण्यास मदत होते.