श्रावणात (Shrawan 2023)अनेक घरांतील अनेक सदस्यांचे उपवास असतात. अशावेळी नेहमी साबुदाण्याची खिचडी, वरीचा भात खाण्याचा कंटाळा येतो. उपवासाच्या दिवशी बाहेरून काहीही खाण्यापेक्षा घरी बनवलेलेच अन्नपदार्थ खाणं जास्त फायदेशीर ठरतं. (Sawan Fasting Recipe's)अशावेळी तुम्ही कमीत कमी वेळात घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या साहित्यापासून उपवासाच्या इडल्या बनवू शकता. साबुदाणा वड्यांसोबत खाल्ली जाणारी ओल्या नारळाची चटणी या इडल्यांबरोबर खाण्यासाठीही उत्तम ऑपश्न आहे. किंवा शेंगदाण्यांची आमटीही बनवू शकता. (How to make upvas idali)
साहित्य
भगर - १ वाटी (२०० ग्राम)
साबुदाणा - १/४ वाटी
दही - १/२ वाटी
सैंधव मीठ - १/२ टिस्पून
बेकींग सोडा - १/४ टिस्पून
कृती
१) साबुदाणा आणि भगर जाडसर वाटून घ्या. एका मोठ्या बाऊलमध्ये साबुदाणा आणि भगरचे मिश्रण घेऊन त्यात दही आणि सैंधव मीठ घालून एकाच दिशेने फेटा. आवश्यकतेनुसार पाणी घालून जाडसर बॅटर बनवा. दही आंबट असेल तर कमी मीठ घाला याऊलट दही आंबट नसेल तर कमी मीठ जास्त घाला.
२) हे मिश्रण १० ते १५ मिनिटांसाठी झाकून ठेवा जेणेकरून भगर आणि साबुदाणे व्यवस्थित फुलतील. इडलीच्या साच्यात १ ग्लास पाणी घालून गॅसवर ठेवा. इडलीच्या साच्यांमध्ये व्यवस्थित तेल लावून मिश्रण घट्ट बनवून घ्या. या मिश्रणात बेकींग सोडा घालून चमच्याने मिसळा. बबल्स आल्यानंतर चमचाने हलवणं बंद करा. कारण सोडा घातल्यानंतर जास्त फेटल्यानंतर हवा बाहेर निघते आणि इडली स्पंजी बनत नाही.
३) आता हे मिश्रण तेल लावून ग्रीस केलेल्या इडलीच्या भांड्यात भरा. झाकण लावून १० ते १२ मिनिटासांठी शिजू द्या. नंतर झाकण उघडा. त्यात टुथपिक किंवा सुरी घालून पाहा. जर सुरी चिकटली नाही तर इडली शिजली आहे असं समजा. त्यानंतर गॅस बंद करून भांडं थंड करून घ्या. सुरीने इडल्या बाहेर काढून घ्या.