उन्हाळ्याचे दिवस सुरु होताच, बहुतांश घरात वाळणाचे पदार्थ करण्यास सुरुवात होते (Sabudana - Batata Papad). पापड, कुरडई, पळी पापड, लोणचे यासह इतर पदार्थ केले जातात (Kitchen Tips). काही पदार्थ उपवासाला देखील चालतात. साबुदाणा पापड, बटाटा चिप्स, साबुदाणा - बटाट्याच्या चकल्या आवडीने केले जातात, आणि खाल्लेही जातात. पण आपण कधी साबुदाणा-बटाट्याचे पळी पापड करून पाहिलं आहे का?
काही वेळेला साबुदाणा - बटाट्याचे पळी पापड मनासारखे तयार होत नाही. किंवा तेलात तळताच फुलत नाही.जर आपल्याकडे वेळ नसेल आणि झटपट पळी पापड करायचे असतील तर, प्रेशर कुकरमध्ये पापडाचं मिश्रण तयार करा. यामुळे काही मिनिटात साबुदाणा बटाट्याचे पळी पापड तयार होतील. शिवाय तेलात तळताच हे पापड दुप्पट फुलतील, आणि कुरकुरीतही लागतील(Upwas special Sabudana Batata Papad).
प्रेशर कुकरच्या दोन शिट्ट्यामध्ये होतील साबुदाणा बटाटा पापड
लागणारं साहित्य
साबुदाणा
बटाटे
रामनवमी स्पेशल : करा प्रसादाचा शिरा, १ वाटीचे प्रमाण - पाहा परफेक्ट रेसिपी
जिरं
मीठ
चिली फ्लेक्स
कृती
सर्वप्रथम, एका भांड्यात २ कप साबुदाणा घ्या. त्यात पाणी घालून साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात थोडं पाणी घालून रात्रभर साबुदाणे भिजत ठेवा. सकाळी साबुदाणा व्यवस्थित दाणेदार भिजला आहे की नाही हे चेक करा. आता अर्धा किलो बटाटे घ्या. बटाट्याचे साल काढून, किसणीने किसून घ्या. त्यात पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या.
उकाड्याने हैराण-तापमान चाळीशी पार? उष्माघाताचा धोका टाळा, खा ५ गोष्टी रोज दुपारी
प्रेशर कुकर घ्या, त्यात ७ कप पाणी घाला. नंतर त्यात भिजलेला साबुदाणा व बटाट्याचा किस घालून मिक्स करा आणि झाकण लावून बंद करा, व गॅसवर ठेवा. प्रेशर कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये मिश्रण शिजेल. प्रेशर कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडा, त्यातील मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घ्या.
नंतर त्यात एक चमचा जिरं, चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स घालून मिक्स करा. प्लास्टिक पेपरवर पळीने थोडं-थोडं मिश्रण ओतून पसरवा. दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्या. अशा प्रकारे साबुदाणा बटाट्याचे पळी पापड खाण्यासाठी रेडी. तेलात तळताच हे पापड दुप्पट फुलतात, शिवाय महिनाभर टिकतात.