Join us  

वाटीभर साबुदाण्याचे ५ मिनिटांत करा खमंग अप्पे, उपवासाची सोपी-खमंग रेसिपी, नक्की ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 2:13 PM

Upwasache Sabudana Appe (Upwasache aape kase banvayche) : साबुदाणा अप्पे (Sabudana Appe) बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ५ ते १० मिनिटं लागतील.

नवरात्रीच्या ९ दिवसांच्या उपवासात नेहमीच नेहमी भगर, खिचडी खायला नको वाटतं. फराळ करताना चमचमीत, खमंग पदार्थ ताटासमोर असावेत असं वाटतं. (Sabudana Appe Recipe) कपभर साबुदाण्यापासून तुम्ही उत्तम रेसेपीज बनवू शकता. साबुदाण्याचे अप्पे हा पदार्थ बनवायला अतिशय सोपा आहे. (A Healthy Evening Snack)

साबुदाण्याचे अप्पे (Sabudana Appe) बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ५ ते १० मिनिटं लागतील.(How to make sabudana Appe) दुपारच्या फराळात तुम्ही ही डीश बनवू शकता किंवा नाश्त्याच्या वेळेला  खाण्यासाठीही उत्तम पर्याय आहे.

साबुदाण्याचे अप्पे कसे बनवावेत? (Sabudana Appe Kase karayche)

१) १ कप साबुदाणे २ मिनिटांसाठी भाजून एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या. मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पावडर बनवून घ्या. साबुदाण्याच्या पावडरमध्ये थोडं-थोडं पाणी घालून पेस्ट बनवून  घ्या. साबुदाणा पाणी शोषून घेतो त्यामुळे तुम्हाला जास्त पाणी लागू शकतं.

हॉटेलसारखे कुरकुरीत साबुदाणा वडे घरीच करा; साबुदाण्यात १ पदार्थ घाला-कमी तेलात होतील वडे

२)  नंतर हा गोळा मॅश केलेल्या बटाट्याच्या पेस्टमध्ये घाला. त्यात १ मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, एक इंचाचा आल्याचा तुकडा घाला. यात १ छोटा चमचा जीरं, चवीनुसार मीठ घालून हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यात पाणी घालून पुन्हा एकजीव  करा.  सेमी लिक्विड मिश्रण तयार झाल्यानंतर १५ मिनिटांसाठी झाकून ठेवा. 

४) १५ मिनिटांनी अप्पे पात्राला तेल लावून घ्या. यात एक-एक स्पून मिश्रण घाला. बेकींग सोडा न घालता हे मिश्रण एकजीव करून घ्या. यात  दोन दोन थेंब तेल घालून अप्पे उलटून घ्या.  व्यवस्थित न पलटल्यास याचा आकार खराब होऊ शकतो. एक-एक करून अप्पे उटलून घ्या. तयार आहेत उपवासाचे कुरकुरीत, खमंग अप्पे. 

उपवासाची चटणी कशी बनवावी? (How to Make Fasting Chutney)

उपवासाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरमध्ये मूठभर कोथिंबीर, अर्धा कप फ्रेश पुदीना, ३ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, अर्धा टिस्पून जीरं घालून दळून घ्या. यात अर्धा लिंबू आणि थोडं पाणी घाला. जर तुम्ही उपवासाला आंबट खात नसाल तर लिंबू वापरणं टाळू शकता.

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सनवरात्री गरबा २०२३शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री