काही पदार्थ असे असतात जे आपण प्रत्येक ऋतूंनुसार खातो. उन्हाळयात थंडावा देणारे, पावसाळ्यात पचनाला हलके तर थंडीच्या दिवसांत उष्णता मिळवून देणारे पदार्थ खाण्याला अधिक प्राधान्य देतो. थंडीच्या (How To Make Udadacha Ghuta At Home) दिवसांत शरीराला उष्णता मिळवून देणारे पदार्थ खाण्याचा (Spicy Urad Dal Ghuta) सल्ला दिला जातो. यानुसार, गूळ, तीळ, ज्वारी, नाचणी, काळे उडीद (Urad Dal Curry Recipe) यापासून तयार झालेले अनेक पदार्थ आपण थंडीच्या दिवसांत खातो. काळी उडदाची डाळ ही सर्व भारतीय घरांमध्ये असतेच. काळी उडदाची डाळ ही आरोग्यासाठी अनेक स्वादिष्ट आणि फायदेशीर डाळींपैकी एक आहे(Udadacha Ghuta Recipe).
यासाठीच थंडीच्या दिवसांत उडदाच्या डाळींचे वेगवेगळे पदार्थ तयार करुन खाल्ले जातात, अस्सल गावरान पद्धतीचं 'काळ्या उडदाच घुटं' हा त्यापैकीच एक खास पदार्थ. आपण नेहमी जशी तूर - मसूर डाळ वापरुन चपाती भातासोबत खायला डाळ करतो त्याचप्रमाणे हे 'उडदाच घुटं' केलं जात. खास करून कडाक्याच्या थंडीत शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भाकरी किंवा भातासोबत हे 'उडदाच घुटं' चवीने खाल्लं जात. थंडीच्या दिवसांत अस्सल गावरान पद्धतीचं मस्त झणझणीत 'उडदाच घुटं' घरच्याघरीच कसं तयार करायचं ते पाहूयात. मस्त गरमागरम 'उडदाच घुटं,' भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि सोबत तोंडी लावायला कांदा हिवाळ्यात हा झक्कास अस्सल गावरान बेत एकदा तरी झालाच पाहिजे.
साहित्य :-
१. लसूण - ७ ते ८ लसूण पाकळ्या
२. आलं - १ टेबलस्पून (किसलेलं किंवा छोटा तुकडा)
३. कोथिंबीर - १ कप
४. हिरव्या मिरच्या - ७ ते ८ हिरव्या मिरच्या
५. जिरे - १ टेबलस्पून
६. सुकं खोबर - १ कप
७. काळी उडीद डाळ - १ कप
८. चणा डाळ - १/२ डाळ
९. कडीपत्ता - ८ ते १० पानं
१०. हळद - १ टेबलस्पून
११. मीठ - चवीनुसार
१२. पाणी - गरजेनुसार
१३. तेल - २ ते ३ टेबलस्पून
कांदा चिरताना डोळ्याला पाण्याच्या धारा? ८ टिप्स, कांदा चिरताना डोळ्यात एक थेंब पाणी येणार नाही
आजी म्हणायची ‘मोरावळा' खा, वर्षभर निरोगी राहा! पाहा मोरावळा करण्याची पारंपरिक रेसिपी...
कृती :-
१. सगळ्यांत आधी कुकरमध्ये गरजेनुसार पाणी घेऊन काळी उडीद डाळ, चणा डाळ एकत्रित शिजवून घ्यावी.
२. आता मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, आलं, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, जिरे, सुकं खोबर थोडेसे पाणी घालून वाटण तयार करुन घ्यावे.
३. एक मोठं पातेलं घेऊन ते गॅसच्या मंद आचेवर गरम करून घ्यावे त्यात तेल, जिरे, कडीपत्ता आणि तयार केलेलं हिरव वाटण, हळद घालावी.
४. वाटण तेलात २ ते ३ मिनिटे चांगले परतून घ्यावे. त्यानंतर शिजवून घेतलेली काळी उडीद आणि चणा डाळ एकत्रित या वाटणात घालावी. गरजेनुसार थोडे पाणी घालावे.
५. आता हे काळ्या उडदाच घुटं एक उकळी येईपर्यंत मंद आचेवर गरम करत ठेवावे.
अशाप्रकारे कुडकुडणाऱ्या थंडीत काळ्या उडदाच घुटं खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम भाकरी आणि मिरचीच्या ठेच्यासोबत हे काळ्या उडदाच घुटं खाण्यासाठी सर्व्ह करावं.