उन्हाळा सुरु झाल्यावर महिलावर्ग पापड, कुरड्या, सांडगे बनवायला सुरुवात करतात. हे पापड वर्षभर टिकतात. घरातील सदस्यांना विविध प्रकारचे पापड आवडतात. काहींना उडदाच्या डाळीचे तर कोणाला बटाट्याचे पापड आवडतात. उडदाच्या डाळीचे पापड आपण सहसा बाजारातून विकत आणून खातो. हे पापड बनवायला खुप अवघड असतात.
पीठ मळण्यापासून ते लाटण्यापर्यत, या पापडाची प्रोसेस खूप मोठी आहे. अचूक प्रमाणात साहित्य घेऊन जर पीठ मळले गेले, तरच हे पापड बरोबर होतात. जर आपल्याला घरच्या साहित्यात, घरातील मसाल्यांचा वापर करून उडदाच्या डाळीचे पापड बनवायचे असतील तर, या रेसिपीला ट्राय करून पाहा(Urad Dal Masala Papad Recipe).
उडदाच्या डाळीचे पापड बनवण्यासाठी लागणरं साहित्य
१ किलो उडीद डाळ
१५ ग्राम पांढरी मिरी
४० ग्राम पापड खार
मटकीला भरपूर आणि लांबसडक मोड येण्यासाठी १ सोपी ट्रिक, मटकीची उसळ होईल चविष्ट
१५ ग्राम पांढरं हिंग
३५ ग्राम मीठ
२० ग्राम काळी मिरी
तेल
पाणी
अशा पद्धतीने बनवा उडदाच्या डाळीचे पापड
सर्वप्रथम, एका परातीत १ किलो उडदाची डाळ घ्या, या डाळीला स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्या. आता त्यात १५ ग्राम पांढरी मिरी घालून, बारीक पीठ तयार करून घ्या. आता यातील ३ ते ४ चमचे पीठ एका बाऊलमध्ये काढून बाजूला ठेवा.
दुसरीकडे, एका कढईत ४० ग्राम पापड खार भाजून घ्या, हे पापड खार भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा, त्यानंतर ३५ ग्राम मीठ भाजून घ्या, व प्लेटमध्ये काढून घ्या. पापड खार आणि मीठ भाजून घेतल्यामुळे पापड वर्षभर चांगले टिकतात.
उकड न काढता, न थापता करा मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी, कोकणी स्टाईल रेसिपी
आता एका मोठ्या परातीमध्ये उडदाच्या डाळीचे तयार पीठ घ्या. त्या पीठामध्ये २० ग्राम काळी मिरीची भरड, ४० ग्राम पापड खार, १५ ग्राम पांढरं हिंग, ३५ ग्राम मीठ घालून मिश्रण एकत्र करा. आता दुसऱ्या परातीला तेल लावून ग्रीस करा, व हाताला देखील तेल लावा, त्यात तयार पीठ घालून गरजेप्रमाणे पाणी मिसळून, घट्ट पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर अर्धा चमचा तेल पिठावर चांगले ग्रीस करून, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये २ ते ३ तासांसाठी झाकून ठेवा.
३ तास झाल्यानंतर पिठाला कुटून घ्या. यासाठी पाटा व वरवंट्याला तेलाने ग्रीस करा. त्यावर हे पीठ ठेऊन चांगले कुटून घ्या. जेणेकरून पापड चवीला खुसखुशीत होतील. आता हाताला तेल लावून पीठ ताणून मळून घ्या, व त्याला लांबट आकार द्या. पीठ तयार झाल्यानंतर एक दोरा घ्या, दोऱ्याला तेल लावून घ्या, व दोऱ्याच्या मदतीने पीठाचे छोटे गोळे कापून घ्या.
तांदुळाची कुरडई खाल्ली आहे कधी? यंदा करून पाहा पांढरीशुभ्र तांदूळ कुरडई, सोपी रेसिपी
गोळे तयार झाल्यानंतर त्यांना तेल लावून ग्रीस करा, आता या गोळ्यांना उडदाच्या डाळीचे पीठ लावून पातळ पापड लाटून घ्या. हे पापड सुती कापडावर सुकत घाला. दोन्ही बाजूने पापड उन्हात सुकवून घ्या. अशा प्रकारे आपले उडदाच्या डाळीचे पापड रेडी. हे पापड तळल्यानंतर दुपट्टीने फुलतात, व बाजारात मिळतात तशी चव या पापडाला येते.