नुसतं भाजी, पोळी, वरण, भात असं जेवण ताटात वाढलं तर ते थोडं अपूर्ण वाटतं. जेवणाची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा त्या जेवणात तोंडी लावायला चटणी, लोणचं, कोशिंबीर असे वेगवेगळे पर्याय असतात. बऱ्याचदा असं होतं की चटणी करण्यासाठी घरात नेमकं काही साहित्य नसतं किंवा मग आपल्याकडे वेळ नसतो (papad chutney recipe). कधी कधी भाजीसाठी काहीच नसतं (how to make papad chutney?). अशावेळी अगदी झटपट तुम्ही ही पापडाची चटणी करू शकता.(urad dal papad chutney in just 1 minute)
पापडाची खमंग चटणी करण्याची रेसिपी
साहित्य
२ ते ३ पापड
पाव वाटी शेंगदाणे
जेवण करून लगेचच शतपावली करता? थांबा.. 'हे' वाचा, आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम
७ ते ८ लसूण पाकळ्या
१ टीस्पून जिरे
२ टेबलस्पून खोबऱ्याचा किस
चवीनुसार लाल तिखट आणि मीठ
कृती
सगळ्यात आधी उडदाचे पापड व्यवस्थित भाजून घ्या आणि त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्या.
खोबरे किसून घ्या आणि कढई गरम करून ते थोडे भाजून घ्या.
रोज सकाळी तुमच्याही पोटात प्लास्टिक जातं का? चहा पिण्याआधी 'या' गोष्टीची खात्री करून घ्या
आता भाजून घेतलेला पापड, शेंगदाणे आणि खोबरे थंड झाले की ते मिक्सरमध्ये घाला. त्यात सोललेला लसूण, जिरे, मीठ आणि चवीनुसार थोडं तिखटसु्द्धा घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्या.
पापडाची खमंग चटणी झाली तयार. या चटणीमध्ये थोडं कच्चंं तेल घाला आणि ती पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा पराठ्यासोबत खा. जेवणात मस्त रंगत येईल.