Join us  

उडदाच्या पापडाचा डोसा? डोसा खाण्याची इच्छा झाली तर ५ मिनिटांत करा हा कुरकुरीत डोसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 2:47 PM

Urad Papad Dosa | Dosa Recipe | Indian Food | Chef Kunal Kapur Recipe डोसे आवडतात पण त्यासाठी बरीच तयारी करावी लागते, मात्र उडीद पापडाच्या डोशाची ही भन्नाट रेसिपी पाहा, खा मस्त डोसा..

तांदूळ व उडीद डाळीच्या मिश्रणाचे डोसे आपण सगळ्यांनीच खाल्ले असतील. त्यात बदल म्हणून आपण रवा, पोहे किंवा ब्रेडचे डोसे देखील ट्राय करून पाहिले असेल. पण आपण कधी पापडाचा डोसा ट्राय करून पाहिला आहे का? ऐकूनच आश्चर्य वाटलं ना? आपण अनेकदा कुरकुरीत पापड फक्त जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी खाल्लं असेल. पण पापडाचा डोसा या रेसिपीचा आपण कधी विचार देखील केला नसेल.

ही अतरंगी रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. नाश्त्याला कधी - कधी काय करावं हे सुचत नाही, जर आपल्याला रोजचे तेच - तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, उडदाच्या पापडांचा क्रिस्पी डोसा ट्राय करून पाहा. ही आगळी - वेगळी क्रिस्पी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल(Urad Papad Dosa | Dosa Recipe | Indian Food | Chef Kunal Kapur Recipe).

उडदाच्या पापडांचा क्रिस्पी डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

उडदाच्या डाळीचे पापड

पाणी

पालकाची भाजी आवडत नसली तरी पालकाची कुरकुरीत वडी नक्की आवडेल, पालक वडीची सोपी रेसिपी

बटर

कृती

सर्वप्रथम, उडदाच्या डाळीच्या पापडांचे तुकडे करा. हे तुकडे एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक कप पाणी घाला. व काही वेळेसाठी भिजू द्या. पापड भिजल्यानंतर चमच्याने चेक करा, की पापड भिजले आहेत की नाही. पापड भिजले की पाण्यासाहित मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. व त्याची पेस्ट तयार करा. हे पीठ जास्त पातळ किंवा घट्ट नसावे.

उकाड्याने गॅससमोर उभे राहावत नाही? गॅस न पेटवता करा कैरी पुदिना चटकदार चटणी

दुसरीकडे नॉन - स्टिक पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यावर थोडं पाणी शिंपडा. त्यानंतर पापडाचे तयार पीठ चमच्याने घालून डोश्याप्रमाणे गोल आकार द्या. काही सेकंद त्यावर झाकण ठेऊन वाफ येऊ द्या. झाकण काढा व डोसाच्या वरच्या बाजूने बटर लावा. व दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजून घ्या. अशा प्रकारे उडदाच्या डाळीचा डोसा खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुणाल कपूरकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.