Dal Chawal Best Food : भारतात सामान्यपणे सगळ्याच घरांमध्ये डाळ-भात बनवला जातो. अनेकांच्या घरात तर रोज डाळ-भात खाल्ला जातो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना डाळ-भात खाणं आवडतं. अनेकांचं तर डाळ-भाताशिवायही जेवणही पूर्ण होत नाही. डाळ-भात अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. डाळ-भात चवीला तर बेस्ट असतोच, सोबतच त्यातून अनेक पोषक तत्वही मिळतात. डाळ-भातातून शरीराला प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी१, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात.
डाळ-भात खाऊन बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. इतकंच नाही तर यानं हृदयरोगाचा धोकाही कमी होतो. वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते. हेच कारण आहे की, अमेरिकेत झालेल्या एका न्यूट्रिशन कॉन्फरन्सनं डाळ-भाताला जगातील सगळ्यात पौष्टिक जेवण असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं.
डाळ-भात सगळ्यात पौष्टिक
डाळ-भाताला अमेरिकेतील एका न्यूट्रिशन कॉन्फरन्सनं सगळ्यात पौष्टिक आहार मानलं आहे. असा दावा केला गेला की, डाळ-भात सगळ्यात हलका आणि पौष्टिक असतो. यानं अनेक समस्या दूर होतात. तसेच शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक पोषक तत्वही मिळतात.
डाळ-भात खाण्याचे फायदे
१) मांसपेशी आणि पचन तंत्रासाठी फायदेशीर
डाळ-भातात प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं. जे मांसपेशीची निर्मिती आणि रिपेअरिंगसाठी मदत करतं. तसेच यात फायबरही भरपूर असतं, जे पचन तंत्र निरोगी ठेवण्याचं काम करतं. डाळ-भातात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, आयर्न, कॅल्शिअम आणि इतरही अनेक मिनरल्स असतात. जे शरीरासाठी गरजेचे असतात.
२) वजन कमी करतो
डाळ-भातात फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे वजन कमी करण्यासही मदत मिळते. डाळ-भातानं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, ज्यामुळे पुन्हा पुन्हा खाण्याची ईच्छा होत नाही आणि अशाप्रकारे ओव्हरईटिंग टाळता येतं.
३) ब्लड शुगर करा कंट्रोल
डाळ-भातात फायबर आणि प्रोटीन भरपूर असतं. ज्यामुळे ब्लड शुगरही नियंत्रित ठेवता येते. तसेच डाळीमध्ये फोलेट आढळतं, जे हृदयरोगाचा धोका कमी करतं आणि हृदय निरोगी ठेवतं.
४) चांगली झोप येते
डाळ-भात खाल्ल्यानं झोपेची क्वालिटी सुधारते. ज्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. यानं स्ट्रेस-डिप्रेशनसारख्या समस्याही दूर होतात. इतकंच नाही तर डाळ-भातानं आळस दूर होतो आणि शरीर अॅक्टिव राहतं.