Join us  

तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या खुसखुशीत पुऱ्या करण्यासाठी १ सोपी ट्रिक, परफेक्ट पुऱ्यांचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 5:16 PM

Use this trick to make less oily puri : पुऱ्या कधी कधी जास्त तेलकट होतात, त्यामुळे खाव्याशा वाटत नाहीत. (Puri Recipe, How To Make Soft, Fluffy, Not-so-oily)

चपाती, भाकरी खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. सणासुदीला पुरी, वडे बनवले जातात. पुरी हा बनवायला  सोपा कमी वेळेत आणि कमी साहित्यात होणार पदार्थ. परफेक्ट पुऱ्या बनवण्यासाठी पुऱ्या करण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी. पुऱ्या कधी कधी जास्त तेलकट होतात त्यामुळे व्यवस्थित खाल्या जात नाहीत. (Puri Recipe, How To Make Soft, Fluffy, Not-so-oily)

१) खमंग पुऱ्या तयार करण्यासाठी एका वाडग्यात २ कप गव्हाचं पीठ घ्या. 

२) त्यात  २ ते ३ चमचे  गव्हाचं पीठ  घाला. त्यात १ चमचा मीठ घाला 

३) व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे गरम तेलाचे मोहन घाला.   थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या.  

४) या  पीठाचे गोळे करून बारीक पोळी लाटून घ्या वाटी किंवा ताटलीच्या साहाय्यानं  गोलाकार पुरीचा शेप तयार करा आणि गरमागरम तेलात पुऱ्या तळा. 

५) तेल व्यवस्थित गरम झाल्याशिवाय त्यात पुऱ्या घालू नका. नाहीतर पुऱ्या जास्त तेलकट होतील. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्स