Join us  

मस्त घट्ट कवडी दही लावण्यासाठी १ खास टिप, दह्याला पाणी सुटणार नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2023 11:58 AM

Useful tips to help set curd in Summer दही पातळ होते, नीट लागत नाही, हा घ्या खास उपाय

दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दही खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. उन्हाळ्यात दही अधिक प्रमाणात खाल्ले जाते. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी 6 आणि व्हिटामिन बी12 या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते. केसातील कोंड्यापासून त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. त्यामुळे दह्याचा आहारात समावेश करावा. 

आजकाल बाजारात कमी दरात एका डब्यात दही मिळते. ते दही घट्ट व चवीला गोड असते. घरी जेव्हा आपण दही तयार करतो. तेव्हा दही घट्ट लागत नाही. त्यातून पाणी सुटते. चवीलाही आंबट होते. बाजारात मिळते तसे घट्ट दही हवे असेल तर, एक टीप फॉलो करा. या एका ट्रिकमुळे दही घट्ट होईल. व चवीलाही गोड लागेल(Useful tips to help set curd in Summer).

घरी दही लावण्यासाठी एक ट्रिक

घरच्या घरी दही लावण्यासाठी आपण स्टील किंवा मातीच्या भांड्याचा वापर करू शकता. मातीचे भांडे असेल तर उत्तम. कारण त्यात दही लगेच जमते. यासह मातीच्या भांड्यात दही लवकर आंबट होत नाही. मुख्य म्हणजे गरम हवामानात दही लवकर सेट होते, व फ्रीजमधून बाहेर ठेवल्यास ते लवकर आंबट होते. मातीच्या भांड्यात दही लावल्याने ते थंड राहते.

खास वाटपौर्णिमेनिमित्त करा आंब्याचा शिरा, सिझन संपण्यापूर्वी करा मस्त - स्पेशल बेत

दही लावण्यासाठी लागणारं साहित्य

फुल क्रीम दूध

२ चमचे दही

दही कसे लावायचे

मोठ्या भांड्यात आवश्यकतेनुसार फुल क्रीम दूध घालून चांगले उकळवा.

दूध घट्ट होईपर्यंत गरम करा, दूध गरम झाल्यानंतर थंड करण्यासाठी फॅन खाली ठेवा.

कोबीचे कबाब!-खरं नाही वाटत ना, पण कोबीचे खमंग कुरकुरीत कबाब करायला सोपे आणि चविष्ट

दूध थोडे कोमट झाल्यावर त्यात २ चमचे आंबट दही घालून मिक्स करा. दुधावरची साय काढू नका त्यातच मिक्स करा.

५ तासापर्यंत दही लागेल, त्यानंतर दह्याचा भांडं फ्रिजमध्ये ठेवा. अशा प्रकारे घट्ट दही खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नसमर स्पेशलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स