Lokmat Sakhi >Food > सायीत घाला लिंबाचा रस आणि एका मिनिटांत मिळेल लोणी आणि पनीर, पाहा नेमकं करायचं कसं..

सायीत घाला लिंबाचा रस आणि एका मिनिटांत मिळेल लोणी आणि पनीर, पाहा नेमकं करायचं कसं..

Very Simple Method Of Making Ghee From Malai Or Cream: सायीपासून लोणी काढायचं काम अनेकजणींना खूप वेळखाऊ वाटतं. म्हणूनच हा एक सोपा उपाय करून पाहा आणि एकाचवेळी लोणी आणि पनीर तयार करा..(useful trick for every woman to make pure ghee, butter and paneer from malai at one time)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2025 18:04 IST2025-02-08T15:07:02+5:302025-02-08T18:04:24+5:30

Very Simple Method Of Making Ghee From Malai Or Cream: सायीपासून लोणी काढायचं काम अनेकजणींना खूप वेळखाऊ वाटतं. म्हणूनच हा एक सोपा उपाय करून पाहा आणि एकाचवेळी लोणी आणि पनीर तयार करा..(useful trick for every woman to make pure ghee, butter and paneer from malai at one time)

useful trick for every woman to make pure ghee butter and paneer from malai in one time | सायीत घाला लिंबाचा रस आणि एका मिनिटांत मिळेल लोणी आणि पनीर, पाहा नेमकं करायचं कसं..

सायीत घाला लिंबाचा रस आणि एका मिनिटांत मिळेल लोणी आणि पनीर, पाहा नेमकं करायचं कसं..

Highlightsया रेसिपीतून तुम्हाला लोणी तर मिळेलच पण त्यासोबतच पनीरसुद्धा खायला मिळेल.

घरी तयार केलेल्या साजूक तुपाची चव जवळपास सगळ्यांनाच आवडते. आरोग्याच्या दृष्टीनेही ते विकत मिळणाऱ्या तुपापेक्षा कित्येक बाबतीत सरस आहे. पण तरीही घरी तूप करण्याचा कंटाळा अनेकजणींना येतो. कारण त्यांना ते काम खूप वेळखाऊ वाटतं. थंडीच्या दिवसात तर सायीपासून लोणी काढणं खरंच खूप जास्त वेळ घेणारं ठरतं. त्यामुळे मग साय जमा करा नंतर त्याचं विरजन लावा आणि मग त्याचं लोणी काढून तूप करा या भानगडीत हल्ली बऱ्याच जणी पडत नाहीत. फक्त वेळेमुळेच तुम्ही घरी तूप करत नसाल तर आता तूप तयार करण्याची ही सगळ्यात सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहा. या रेसिपीतून तुम्हाला लोणी तर मिळेलच पण त्यासोबतच पनीरसुद्धा खायला मिळेल.(useful trick for every woman to make pure ghee, butter and paneer from malai at one time)

 

सायीपासून लोणी काढण्याची सगळ्यात सोपी रेसिपी

लिंबाचा वापर करून सायीपासून लोणी कसं काढायचं याची रेसिपी MaaYehKaiseKarun या यु ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे.

यामध्ये असं सांगितलं आहे की सगळ्यात आधी फ्रिजमध्ये जमा केलेली साय फ्रिजच्या बाहेर काढा आणि एखाद्या मोठ्या भांड्यात घालून ठेवा. 

८ दिवस टिकणारी पापडाची खमंग चटणी, भाजीला काही नसल्यास १ मिनिटात करा चवदार रेसिपी

२ ते ३ तासांनी जेव्हा सायीचं तापमान नॉर्मलवर येईल तेव्हा त्यामध्ये लिंबाचा रस घाला आणि हलवा. त्यानंतर अगदी थोडं थोडं करून तीन ते चार वेळा बर्फाचं थंडगार पाणी घाला आणि साय हलवत राहा. काही सेकंदातच लोणी वेगळं झाल्याचं जाणवेल.

आता लोणी वेगळ्या भांड्यात काढा आणि २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर एखाद्या कढईमध्ये घालून ते तूप करण्यासाठी गरम करायला ठेवा.

 

आता लोणी काढून घेतल्यानंतर कढईमध्ये जे काही दूध उरलेलं आहे ते दूध गॅसवर गरम करायला ठेवा. त्या दुधात लिंबाचा रस आहे. त्यामुळे ते तुम्ही गरम करायला ठेवल्यावर एखाद्या मिनिटांतच फाटेल. जर दूध फाटलं नाही तर त्यात आणखी थोडा लिंबाचा रस घाला.

भरपूर कॅल्शियम देणारे ५ शाकाहारी पदार्थ! मुलं दूध पित नसतील तर 'हे' पदार्थ खाऊ घाला..

काही सेकंदात घट्ट पदार्थ वेगळा होईल आणि पाणी बाजुला निघेल. आता हे मिश्रण गाळून घ्या आणि पनीर सेट होण्यासाठी एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवा. सायीपासून एकाचवेळी लोणी, तूप आणि पनीर तयार करण्याची ही मस्त रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा. 

 

Web Title: useful trick for every woman to make pure ghee butter and paneer from malai in one time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.