Join us  

चीज - पनीर किसताना ते किसणीला जास्त चिकटून वाया जाऊ नये म्हणून २ टिप्स, बघा भन्नाट झटपट उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2023 4:07 PM

Using Cheese At Home & Half Of It Stays Stuck To The Grater While Grating : Amazing Quick Solution : किसणीवर चीज किसल्याने किसणीला चिकटलेले चीज वाया जाऊ नये यासाठी २ सोप्या ट्रिक्स...

चीज हा सगळ्यांच्याच फार आवडीचा पदार्थ आहे. पूर्वी कधी काळी खायला मिळणारे चीज आता सगळ्याच घरांमध्ये सहज उपलब्ध असते. पिझ्झा, बर्गर, सॅन्डविच यांसारख्या विदेशी पदार्थांवर भरपूर चीज घालून खाल्ले जायचे. परंतु आता पोळी पासून डोश्यापर्यंत सगळ्याच भारतीय पदार्थांमध्ये आपण चीजचा वापर सर्रास करतो. आजकाल बाजारांत वेगवेगळ्या पद्धतींचे फ्लेवर्ड चीजदेखील विकत मिळतात. मोझरेला चीज, शेडार चीज, ब्री चीज, फेटा चीज असे चीजचे विविध प्रकार आपण पाहिले असतील.

सध्याच्या काळात चीजशिवाय भारतीय पाककृतीची कल्पनाच केली जाऊ शकत नाही. बहुतेक भारतीय घरांमध्ये चटकदार, चमचमीत पदार्थांवर चीज किसून घातले जाते. चीज किंवा पनीर किसण्यासाठी आपण किचनमधील किसणीचा वापर करतो. किसणीवर चीज व पनीर किसताना ते आपल्याला हवे तसे बारीक किसून मिळते. बहुतेकवेळा किसणीवर चीज व पनीर किसताना, किसणीला असलेल्या छिंद्रांमध्ये बरेचसे चीज चिकटून वाया जाते. अशा वेळी आपण किसणीला चिकटलेले चीज हाताने किंवा चमच्याने काढायचा प्रयत्न करतो. परंतु ते किसणीला चिकटलेले चीज लगेच निघत नाही. किसणीवर चीज किसल्याने बऱ्याच प्रमाणांत चीज किसणीला चिकटून वाया जाते. अशा परिस्थिती हे चीज वाया जाऊ नये म्हणून एक सोपी ट्रिक वापरु शकतो. जेणेकरून चीज व्यवस्थित एकसारखे किसले जाऊन किसणीला चिकटून वाया जाणार नाही(Using Cheese At Home & Half Of It Stays Stuck To The Grater While Grating : Amazing Quick Solution). 

नक्की काय करता येऊ शकत ? 

टीप १ : सर्वप्रथम आपण ज्या किसणीवर चीज किंवा पनीर किसणार आहात, किसणीच्या त्या भागांवर आतून व बाहेरून अशा दोन्ही बाजुंनी फूड ब्रशच्या मदतीने थोडेसे तेल लावून घ्यावे. तेल लावून घेतल्यानंतर किसणीवर चीज किंवा पनीर किसून घ्यावे. असे केल्याने चीज किसणीला न चिकटता आपोआप डिशमध्ये पडेल.  

टीप २ : चीज किंवा पनीर किसून घेण्याआधी किमान १५ ते २० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे. १५ मिनिटांनंतर चीज किंवा पनीर फ्रिजमधून काढून लगेच किसणीवर किसावे. यामुळे जास्तीचे चीज किंवा पनीर किसणीला चिकटून वाया जाणार नाही.  

 

असे केल्याने चीज किंवा पनीर किसणीच्या छिद्रांमध्ये चिटकून बसणार नाही. यामुळे आपले चीज किंवा पनीर वाया जाणार नाही आणि एकसारखे व्यवस्थित किसून होईल.

टॅग्स :किचन टिप्स