पूर्वी लाडू, करंजी, अनारसे असे गोड पदार्थ फक्त सणासुदीच्या दिवशीच मिळायचे. पण आता मात्र तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा हे सगळे पदार्थ मिळू शकतात. कित्येक प्रकारच्या मिठाई बाजारात रोजच उपलब्ध असतात. त्यामुळे त्यात आता काही नाविन्य वाटत नाही. पण अजूनही 'खजला मिठाई' हा असा एक गोड पदार्थ आहे जो वर्षातून फक्त एकाच महिन्यात मिळतो (Uttar Pradesh's Special Khajala Mithai). त्यामुळे जेव्हा हा पदार्थ बाजारात येतो, तेव्हा तो घेण्यासाठी खवय्यांची अक्षरश: रांग लागते.
खजला मिठाई ही मूळची राजस्थानची. पण आता मात्र ही मिठाई खायची असेल तर तुम्हाला उत्तर प्रदेशातल्या मऊ जनपद या ठिकाणी जावं लागेल. कारण राजस्थानचा हा पारंपरिक पदार्थ आता उत्तर प्रदेशमध्येच मिळतो आणि तोही फक्त नवरात्र- दसरा या काळातच उपलब्ध असतो.
हिवाळ्यात पांढराशुभ्र मुळा आठवणीने खा! वाचा मुळा खाण्याचे ७ फायदे- वजनही घटेल-सौंदर्यही खुलेल
मैदा, साखर आणि तूप हे तीन पदार्थ भरपूर प्रमाणात वापरून खजला केला जातो. वर वर पाहता त्याचा आकार एखाद्या मोठ्या पुरीसारखाच दिसतो. पण तिच्या पोटात मात्र वेगवेगळे गोड पदार्थ भरलेले असतात. कित्येक तासांच्या मेहनतीनंतर हा पदार्थ तयार होतो. त्यामुळेच तो इतर सगळ्या पदार्थांपेक्षा वेगळा ठरतो.
खवा घालून केलेला खजला, दूध घालून केलेला खजला, चेरीचा खजला, कमी गोड असणारा खजला आणि नमकीन प्रकारातला खजला असे याचे ५ प्रकार आहेत. यापैकी खवा आणि दुधाचा खजला जरा महाग असतो आणि तो दोन दिवसच टिकतो.
वेटलॉससाठी हृतिक रोशनच्या बहिणीने सगळ्यात आधी केली 'ही' गोष्ट, सुनैनासारखं फिट व्हायचं तर....
पण बाकी इतर प्रकार मात्र १५ दिवस ते १ महिना टिकू शकतात. दुधाचा आणि खव्याचा जो खजला असतो त्याची किंमत साधारण १३० ते १५० रुपये प्रतिनग एवढी असते. तर इतर प्रकार ५० रुपये ते ७० रुपये प्रति नग या प्रमाणात मिळतात. खजला खायचा असेल तर नवरात्र- दसरा या काळात एकदा उत्तर प्रदेशचा दौरा करायला हवा. कारण तेव्हाच या मिठाईचा स्वाद घेता येतो.