Lokmat Sakhi >Food > Valentines Day 2022 : प्यार का इजहार, ‘रोज डिश’ के साथ! 'त्या' स्पेशल व्यक्तीसाठी गुलाबाचे खास पदार्थ

Valentines Day 2022 : प्यार का इजहार, ‘रोज डिश’ के साथ! 'त्या' स्पेशल व्यक्तीसाठी गुलाबाचे खास पदार्थ

Valentines Day 2022 : रोज डे पासून सुरू होणारा आणि व्हॅलेंटाईन्स डे ला संपणारा व्हॅलेंटाईन्स वीक आपल्या खास व्यक्तीसाठी आणखी खास करायचा असेल तर त्याला किंवा तिला गुलाबापासून तयार होणारे हे पदार्थ नक्की करुन द्या...प्रेम फुलायला होईल मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 04:20 PM2022-02-08T16:20:29+5:302022-02-08T16:38:06+5:30

Valentines Day 2022 : रोज डे पासून सुरू होणारा आणि व्हॅलेंटाईन्स डे ला संपणारा व्हॅलेंटाईन्स वीक आपल्या खास व्यक्तीसाठी आणखी खास करायचा असेल तर त्याला किंवा तिला गुलाबापासून तयार होणारे हे पदार्थ नक्की करुन द्या...प्रेम फुलायला होईल मदत

Valentines Day 2022: An expression of love, with 'Rose Dish'! Special rose petals for 'that' special person | Valentines Day 2022 : प्यार का इजहार, ‘रोज डिश’ के साथ! 'त्या' स्पेशल व्यक्तीसाठी गुलाबाचे खास पदार्थ

Valentines Day 2022 : प्यार का इजहार, ‘रोज डिश’ के साथ! 'त्या' स्पेशल व्यक्तीसाठी गुलाबाचे खास पदार्थ

Highlightsगुलाबाच्या पाकळ्या दिसायला जितक्या सुंदर असतात तितक्याच त्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात...प्रेमाचे प्रतीक असलेला गुलाब एकमेकांना द्याच, पण त्यापासून तयार केलेले पदार्थही खाऊ घाला..पाहा प्रेम आणखी फुलेल की नाही...

व्हॅलेंटाईन्स डे Valentines Day, व्हॅलेंटाईन्स वीक Valentines Week असे सगळे म्हटले की आपल्याला सगळ्यात आधी आठवतो तो प्रेमाचे प्रतीक असलेला लाल गुलाब Red rose. रोज डे Rose Day असो नाहीतर अजून कोणता डे, आपल्या आवडत्या व्यक्तीला देण्यासाठी गुलाब तर हवाच. व्हॅलेंटाईन्स वीकची सुरुवात रोज डे ने होत असली तरी शेवट हा व्हॅलेंटाईन्स डेने होतो. प्रेमाचे प्रतीक Symbole of Love असलेला गुलाब एकमेकांप्रती प्रेम व्यक्त कऱण्यासाठी ज्याप्रमाणे वापरला जातो त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पदार्थांसाठीही गुलाबाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. गुलाबापासून केलेले हे पदार्थ अतिशय चविष्ट आणि आरोग्यासाठीही तितकेच उपयुक्त असतात. तेव्हा तुमच्यातला शेफ जागा करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी गुलाब देण्याबरोबरच गुलाबाचे हटके आणि चविष्ट पदार्थ तयार करायलाही विसरु नका. त्यामुळे व्हॅलेंटाईन्स डे नेहमीपेक्षा जास्त खास करायचा असेल तर पाहूयात गुलाबापासून आपण कोणते पदार्थ कशा पद्धतीने करु शकतो....

१. काजू रोज बर्फी 

गुलाब पाकळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंटस आणि व्हिटॅमिन ए,सी,डी,इ हे घटक असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. इतकेच नाही तर गुलाबाचा सौंदर्य प्रसाधनांबरोबरच आहारात समावेश केल्यास उत्तम फायदा होतो. मिल्क पावडर, पिठीसारख, काडूची पेस्ट आणि गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट किंवा बारीक काप यांपासून अतिशय सुंदर अशी काजू रोज बर्फी तयार करता येते. तुमच्या जोडीदाराला गोड खायला आवडत असेल तर स्वत:च्या हाताने केलेल्या या बर्फी देणे हा उत्तम पर्याय ठरु शकेल. 

(Image : Google)
(Image : Google)

२. गुलाबाच्या पाकळ्यांचा भात

गुलाब पाकळ्यांना एकप्रकारचा स्वाद आणि फ्लेवर असतो. आपण नारळी भात, साखरी भात किंवा फळे आणि सुकामेवा घालून काश्मिरी पुलाव ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे गुलाब पाकळ्यांपासून भात केल्यास तो अतिशय चविष्ट लागतो. वेगळा प्रकार म्हणून आपण हा भात नक्की ट्राय करु शकतो. 

(Image : Google)
(Image : Google)

३. रोज शेक

आपण अनेकदा रोज आईस्क्रीम, रोज मस्तानी, रोज फ्लेवरचा फालुदा हे प्रकार खातो. यामध्ये घरच्या घरी करता येईल असा रोज शेक आपण अगदी सहज करु शकतो. गुलाबाच्या पाकळ्या, रोज आईस्क्रीम, साखर आणि दूध सांपासून हा शेक तयार होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत तर हा शेक म्हणजे शरीराला एनर्दी देणारे उत्तम पेय ठरु शकते. 

(Image : Google)
(Image : Google)

Web Title: Valentines Day 2022: An expression of love, with 'Rose Dish'! Special rose petals for 'that' special person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.