Lokmat Sakhi >Food > Valentines Day 2023 : लालचुटूक गुलाबच कशाला, गिफ्ट द्या लालबुंद पौष्टिक बीटरुट क्रॅकर्स, खास पदार्थ- जो दिल जीत ले!

Valentines Day 2023 : लालचुटूक गुलाबच कशाला, गिफ्ट द्या लालबुंद पौष्टिक बीटरुट क्रॅकर्स, खास पदार्थ- जो दिल जीत ले!

Valentines Day 2023 : Beetroot & Seed Crackers Recipe : आपल्या आवडत्या माणसाचं मन जिंकण्यासाठी उत्तम पदार्थ करुन खाऊ घालणं हा सोपा आणि रोमॅण्टिक पर्याय असतोच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2023 12:50 PM2023-02-13T12:50:52+5:302023-02-13T13:26:21+5:30

Valentines Day 2023 : Beetroot & Seed Crackers Recipe : आपल्या आवडत्या माणसाचं मन जिंकण्यासाठी उत्तम पदार्थ करुन खाऊ घालणं हा सोपा आणि रोमॅण्टिक पर्याय असतोच.

Valentines Day 2023 : Why only red roses, give red heart nutritious beetroot crackers, do special recipe.. | Valentines Day 2023 : लालचुटूक गुलाबच कशाला, गिफ्ट द्या लालबुंद पौष्टिक बीटरुट क्रॅकर्स, खास पदार्थ- जो दिल जीत ले!

Valentines Day 2023 : लालचुटूक गुलाबच कशाला, गिफ्ट द्या लालबुंद पौष्टिक बीटरुट क्रॅकर्स, खास पदार्थ- जो दिल जीत ले!

फेब्रुवारी महिना प्रेमाचा गुलाबी महिना म्हणून ओळखला जातो. व्हॅलेण्टाइन्स डे अवघ्या काही दिवसांवर आला आहे. प्रत्येक प्रेमी युगुल या प्रेमाच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. लोक व्हॅलेण्टाइन्स डे वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात, परंतु प्रत्येकामध्ये एक गोष्ट समान असते, ती म्हणजे आपल्या जोडीदाराला खास भेट देण्याची इच्छा. विशेषत: मुलींना व्हॅलेण्टाइन्स डे च्या निमित्ताने आपल्या प्रियकराला सर्वोत्तम गिफ्ट द्यायचे असते. पण त्यांना काय द्यावे हा मोठा प्रश्न असतो. असं म्हणतात आपल्या प्रिय व्यक्तींना खुश करण्याचा मार्ग हा त्यांच्या पोटातून जातो. त्यामुळे या व्हॅलेण्टाइन्स डेला आपल्या खास व्यक्तीला महागडे गिफ्ट देण्यापेक्षा त्यांच्यासाठी खास व्हॅलेण्टाइन्स डे स्पेशल : हेल्दी बीटरुट क्रॅकर्स बनवून खुश करा. आपल्या प्रियकराला हे खास गिफ्ट देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करा(Valentines Day 2023 : Beetroot & Seed Crackers Recipe). 

साहित्य :- 

१. बीट - २ (उकळवून घेतलेले)
२. भोपळ्याच्या बिया - १५० ग्रॅम 
३. सूर्यफुलाच्या बिया - १५० ग्रॅम
४. पांढरे तीळ - १/२ टेबलस्पून 
५. अळशी - १/२ टेबलस्पून 
६. नाचणीचे पीठ - गरजेनुसार
७. मीठ - चवीनुसार
८. काळीमिरी पूड - चिमूटभर 
९. ऑरेगानो - चिमूटभर 

कृती :- 

१. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात भोपळ्याच्या व सूर्यफुलाच्या बिया घालून त्याची एकत्रित बारीक पूड करून घ्यावी. 
२. उकळवून घेतलेल्या बीटाचे छोटे तुकडे करून मिक्सरमधून बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. 
३. आता एका मोठ्या बाऊलमध्ये भोपळ्याच्या व सूर्यफुलाच्या बियांची पूड आणि बीटरूटची पेस्ट एकत्रित करून घ्यावी. 
४. त्यानंतर या मिश्रणात चिमूटभर मीठ, काळीमिरी पूड, ऑरेगानो घालून घ्यावे व संपूर्ण मिश्रण चमच्याने एकजीव करून घ्यावे. 
५. सगळ्यांत शेवटी या मिश्रणात थोडे नाचणीचे पीठ घालून मिश्रण थोडे घट्टसर करून घ्या. 


६. आता मायक्रोव्हेव ओवनचा एक मोठा ट्रे घेऊन त्यावर बटर पेपर अंथरा त्यावर हे मिश्रण घालून हाताच्या मदतीने मिश्रण थापून सपाट करुन घ्यावे. 
७. गरज पडल्यास त्या मिश्रणावरून एक बटर पेपर ठेवून लाटणीच्या मदतीने हे मिश्रण सपाट करून घ्या. 
८. आता त्यावर पांढरे तीळ व अळशी भुरभुरवून घ्यावी. 


९. आता हार्ट शेपचा साचा घेऊन या पिठावर हलकेच दाबून क्रॅकर्सना आकार द्यावा. 
१०. मायक्रोव्हेव ओवन २०० डिग्री तापमानावर २० मिनिटे प्री - हिट करून घ्यावा त्यात हे क्रॅकर्स ठेवून बेक करून घ्यावेत. 
११. १० ते १५ मिनिटानंतर क्रॅकर्सची दुसरी बाजू देखील ओवनमध्ये बेक करून घ्यावी. 

हेल्दी बीटरूट क्रॅकर्स खाण्यासाठी तयार आहेत.

Web Title: Valentines Day 2023 : Why only red roses, give red heart nutritious beetroot crackers, do special recipe..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.