Join us

वर्षभर टिकणारा वाळवणाचा पदार्थ, पोह्याचे मिरगुंड, पचायला अगदी हलके आणि चविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2025 13:42 IST

Valvancha Padarth Pohyacha Mirgund: Valvancha Padarth Pohes: Mirgund Padarth Marathi: Mirgund Recipe: Tasty Mirgund Dish: Tips for Making Mirgund Pohes: How to Make Pohyacha Mirgund: Benefits of Valvancha Padarth Pohes: Fresh Recipe for Making Mirgund Pohes: Recipe: Food:सणासुदीला विकतचे पापड आणण्याऐवजी घरीच बनवा पोह्याचे मिरगुंड

उन्हाळा आला की, गृहिणींना अनेक वाळवणाचे पदार्थ करण्याची इच्छा होते.(Valvancha Padarth Pohyacha Mirgund) पापड, कुरड्या, लोणची, मसाला, सांडगे अशा अनेक पदार्थांची रेलचेल आपल्या स्वयंपाकघरात पाहायला मिळते. पावसाळ्यात किंवा घरात काहीच नसेल की, हा तोंडी लावणारा पदार्थ हमखास उपयोगी येतो.(Tasty Mirgund Dish) कधी भाजी नसली किंवा भाजी खाण्याची इच्छाच झाली नाही की या पदार्थांची आपल्याला गरज भासते. वाळवणाचे पदार्थ म्हटलं की, अनेकदा ते फसतात किंवा फारसे टिकत नाही. कधी मोजमाप चुकत तर कधी पुरेशा प्रमाणात ऊन मिळत नाही. 

सध्या हळूहळू उन्हाचा तडाखा चांगलाच वाढताना दिसत आहे. (How to Make Pohyacha Mirgund) अशातच ग्रामीण भागातील महिला वर्षभर साठवता येतील अशा वाळवणाचे पदार्थ तयार करण्यात व्यस्त असतीलच. मराठमोठ्या संस्कृतीची खास ओळख म्हणजे वाळवणाचे पदार्थ. सणासुदीला विकतचे पापड आणण्याऐवजी घरीच बनवा पोह्याचे मिरगुंड. चवीला अगदी उत्तम आणि पचायला हलके. पाहूया पोह्याची बॉबी किंवा मिरगुंड रेसिपी. 

महाशिवरात्री स्पेशल: साबुदाण्याची खिचडी-वडा नेहमीचा, करा उपवासाचे फ्रेंच फ्राइज, कुरकुरीत आणि स्वादिष्ट

साहित्य 

जाड पोहे - अर्धा किलोकोमट पाणी - ५ वाटीलाल मिरची पावडर - अर्धा चमचा मीठ - चवीनुसारपापडखार - अर्धा चमचा

कृती 1. सगळ्यात आधी पोहे कढईत चांगले भाजून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात त्याची बारीक पावडर करा. 

2. तयार पावडर चाळून घ्या. त्यानंतर वाटीच्या साहाय्याने पीठ मोजून ताटात घ्या. 

3. पीठच्या इतकेच पाणी घेऊन गरम करा. तोपर्यंत पीठात लाल मिरची पावडर, मीठ आणि पापडखार घालून एकत्र कर 

4. पाणी कोमट झाल्यानंतर पिठात घालून चांगले मळून घ्या. पिठ चिकटत नसेल तर ते चांगले मळले गेले आहे, असे समजावे. 

5. उरलेले कोमट अर्धी वाटी पाणी हळूहळू घालून ठेवा. ५ ते १० मिनिटे पीठ झाकून ठेवा. त्यानंतर पुन्हा पीठ चांगले मळून घ्या. 

6. पिठाचा गोळा करुन पापडच्या साच्यात भरा. ओल्या सुती कापडावर लांब आकाराचे पापड टाका.

7. २ दिवस कडक उन्हात सुकवा. सुकल्यानंतर कधीही तळून खाऊ शकता. पोह्याची बॉबी किंवा मिरगुंड  

टॅग्स :अन्नपाककृती